
आष्टी (प्रतिनिधी)
माणसांचे पामर,विषयी, जिज्ञासु व मुक्त असे चार प्रकार
असतात.यापैकी पामर,विषयी व जिज्ञासु किंवा मुमुक्षु या तिन्ही प्रकारच्या माणसाला
अवतार (जन्म) घेता येत नाही परंतु मुक्ताला अधिकार आहे.मुक्तामध्ये दोन प्रकार
आहेत.प्रयत्न करुन मुक्ततेला प्राप्त झालेले इंजन योगी आणि मुक्तच असलेला पण
समाजासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेणारा युक्त योगी असतो.त्या युक्त योग्यात संत
तुकाराम महाराज आहेत.युक्त योग्याला स्वातंत्र्य असते.म्हणुनच तुकाराम महाराज
म्हणतात " उपजोनिया पुढती येऊ,काला खाऊ दहिभात " असे म्हणतात. जन्माला यायचा अधिकार
कुणाला ? तर युक्त योग्याला अधिकार आहे असे सांगत समाजात काही माणसं अशी असतात
की,त्यांचा अभिमान बाळगावा तेवढा कमी असतो. समाजात जशी चांगली माणसं असतात तशी
कांही प्रमाणात का होईना पण अत्यंत वाईट प्रवृत्तीचीही माणसं असतात.वाईट
प्रवृत्तीच्या माणसाकडे अहंकार, मीपणा,स्वार्थ,ईर्षा,द्वेष,आप-पर,क्रोध मोठ्या
प्रमाणावर असतात. स्वार्थाशिवाय यांना काही सूचत नाही. आई- वडीलांना योग्य ते स्थान
न देणारे पण नको त्याला नको तेवढे महत्व देणारे मूर्ख लोक समाजात आहेत म्हणूनच
संत,महात्म्यांना यांच्यासाठी स्वतःचे आयुष्य कारणी लावावे लागते. सामाजिक कार्य
करीत आपल्या उत्पन्नातील काही वाटा धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खर्च करणारेही लोक
आहेत. आष्टी शहरातील सोन्या चांदीचे प्रसिद्ध व्यापारी संतोषशेठ मेहेर आणि विजयशेठ
मेहेर हे स्व.प्यारीबाई गोकुळदासजी मेहेर आणि स्व.जयकुमार मेहेर यांचे स्मरणार्थ
मेहेर ज्वेलर्सच्यावतीने सप्ताहातील महाप्रसादाची महापंगत दिली.अनेक वर्षापासुन
मेहेर ज्वेलर्स यांंच्यावतीने हनुमंतगांवला काल्याची महापंगत देऊन अन्नदान करीत
आहेत.आष्टीचे मेहेर ज्वेलर्सची काल्याची महापंगत देण्याची परंपरा स्तुत्य असल्याचे
प्रतिपादन ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले. आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथे
श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सवनिमित्त वै.संत मदन महाराज बिहाणी यांच्या
कृपा आशीर्वादाने वह.भ.प.आजिनाथ महाराज झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज
ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता.या सप्ताहातील
काल्याचे कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. " उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दहिभात " या
संत जगतगुरु तुकाराम महाराज यांंच्या अभंगावर त्यांनी निरुपन केले.यावेळी माजी आ.
साहेबराव दरेकर,युवानेते जयदत्त धस,जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे,राम खाडे,ह.भ.प.
दिनकरराव तांदळे,सुखलाल मुथा, डाॕ.मधुकर हंबर्डे, बलभीम सुंबरे,संजयशेठ मेहेर,रभाजी
राऊत, रतिलाल कटारिया, महादेवनाना शिंदे, कल्याण काकडे,अमोल जगताप,पंढरीनाथ
पारखे,सुनिलशेठ मेहेर,अनिलशेठ मेहेर,नवनीत कटारिया, किसनशेठ कटारिया यांंच्यासह आदि
सामाजिक राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर,हनुमंतगांवचे ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते. अनेकवेळा प्रयत्न करूनही किंवा अनेक संधी देऊनही जर एखादा
व्यक्ति त्याचे दुष्कृत्य सोडतच नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते.अशा
हट्टी लोकांना शिक्षेशिवाय पर्याय नसतो.अशांना शिक्षा दिली नाही तर यांचे दुष्कृत्य
वाढतच जाते म्हणून कायद्यानुसार शिक्षा होण्यासाठी पुढाकार घेणे आपले कर्तव्य ठरते.
संसाराने कोणालाच हसु दिले नाही.संसारात दुःखी असणे नवल नाही तर संसारात सुखी असणे
हेच नवल आहे. सर्वसामान्य हे अज्ञान निद्रेत असतात. अज्ञानाच्या निद्रेत आपण झोपतो
तेथे संत जागे असतात.भोग भोगण्यासाठी आयुष्य आणि आरोग्य लागते. परमार्थ थोडा जरी
केला तरी त्याला फळ मिळते. संसार कितीही केला तरी फळ नाही.समाजात
पामर,विषयी,मुमुक्षु (जिज्ञासु) आणि ज्ञानी (मुक्त) असे चार वर्ग असतात.सेवा
,परोपकार हा सर्वात मोठा धर्म आहे.सेवा व परोपकार केल्याने स्वामी होता येते.पाप
जास्त झाले की,अधोगती होते.जास्त पुण्याने उत्तम गती मिळते.ममुक्षु,जिज्ञासु आणि
साधक साधकाची दशा उदास असावी लागते.मंद ममुक्षु आणि तिव्र ममुक्षु हे ममुक्षुचे दोन
प्रकार आहेत.पुन्हा पुन्हा जन्म हा मुक्त योग्याला घेता येत असतो. म्हणुन तुकाराम
महाराज म्हणाले की, उपजोनिया पुढती येऊ,काला खाऊ दहिभात असे सांगीतले. काल बुधवारी
दि.२४ एप्रिल रोजी संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल
यांचे काल्याचे किर्तन झाले.यावेळी विजयशेठ मेहेर,ह.भ.प.दिनकरराव तांदळे,जेष्ठ
पत्रकार अनंत हंबर्डे,युवानेते जयदत्त धस यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन
व आभार अमोल जगताप यांनी मानले.
0 टिप्पण्या