Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील लाल फेटा कालबाह्य होतोय ? ...................................... जुन्या जाणत्या मार्गदर्शक आजोबांच्या मार्गदर्शनाची आज वानवा!

आष्टी ( प्रतिनिधी ) 'जुनं ते सोनं!' असं म्हणतात.जुन्या काळामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये लाल,गुलाबी,पांढरा, पिवळा फेटा बांधून प्रत्येक महत्त्वाच्या निर्णय प्रसंगी मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे आजोबा अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू असायचे;परंतु अलीकडच्या काळामध्ये हा लाल फेटा आणि जुनी मार्गदर्शक मंडळी दुरापास्त आणि कालबाह्य होत असल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बाब समोर येत आहे.भारत हा खेड्यांचा देश आहे असे गांधीजी म्हणायचे म्हणूनच खेड्यांचा विकास म्हणजे देशांचा विकास अशी त्यांची भूमिका होती. त्यानुसार ग्रामीण भागामध्ये सण वृत्त वैकल्य विवाह आणि महत्त्वाच्या निर्णय प्रसंगी ही जुनी जाणती जेष्ठ मंडळी आजोबा यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असायचा.न्यायालय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.लाल भरजरी फेटा,पांढरे शुभ्र धोतर आणि शर्ट असा साधारणतः पेहराव ग्रामीण भागातील या जेष्ठ मंडळींचा ठरलेला असे.आजही अशा प्रकारची मंडळी अत्यंत दुर्मिळपणे ग्रामीण भागामध्ये मोबाईल विना गावाच्या प्रमुख भागातील झाडाखाली बसलेली पहायला मिळतात परंतु दुर्दैवाने आज त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते.त्यांचे मार्गदर्शन घेतले जात नाही.त्यामुळे अनेक तरुणांचे निर्णय चुकून अत्यंत चुकीच्या मार्गाने समाज भरकटत असल्याचे दुर्दैवी वास्तव आहे.संस्काराची मूल्य आज त्यामुळे दुरापास्त झाले असल्याचे ज्येष्ठांचे म्हणणे आहे. फेट्यावाल्या सर्व आजोबांचे आज मितीस ७० ते ८० वय आहे.त्यांचे आणखी २० वर्षे वयोमान आहे. त्यांच्यानंतर फेटा बांधलेला माणुसच दिसणार नाही हे दुर्दैव आहे. ------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या