आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवार दि.२५ एप्रिल रोजी ५०
बिनटाक्याची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.कॅम्प जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.अशोक बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे, स्त्री रोग
तज्ञ डॉ.सावंत, डॉ.मस्तूद यांच्या मदतीने भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.५०
लाभार्थ्यांचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.त्यासाठी येथील
सर्व कर्मचारी,सिस्टर शेख बेबी,सिस्टर घोडके,मेहरकर,अशोक भुसनर व इतर आशा वर्कर
यांच्या मदतीने शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. दिवसेंदिवस वाढती उष्णता पाहून जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांच्या कल्पनेतून नवीन उष्माघात व आपत्कालीन विभाग सुरू
करण्यात आला आहे.त्यांनी उष्माघाताचे लक्षणे जसे अस्वस्थता,थकवा,चक्कर,डोके
दुखणे,रक्तदाब वाढणे असे लक्षण जाणून आल्यास अती तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना
दाखवून घेण्यात यावे असे आवाहन केले.याबद्दल ग्रामीण रुग्णालयातील सर्व
डाॕक्टर्स,कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे
0 टिप्पण्या