Ticker

6/recent/ticker-posts

डोळे बांधून वाचन करणारी आष्टीची यशश्री गावडे! ......................................... एक महिन्यात गुरु सुरेश गर्जे सरांच्या अध्यापनातून कला झाली अवगत... --------------------

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील आदर्श विद्यालयातील इयत्ता तिसरीच्या वर्गात असणाऱ्या चिमुकलीला डोळ्याला पट्टी किंवा रुमाल बांधल्यानंतर वर्तमानपत्र किंवा कुठल्याही पुस्तकातील वाचन करून दाखवणारे कु.यशश्री संदीप गावडे हीच्या या आगळ्यावेगळ्या कलेचे कौतुक केले जात आहे. यशश्री संदीप गावडे ही आदर्श विद्यालय आष्टी येथे इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेते. विराज संदीप गावडे ही आठवीमध्ये असणारे दोन मुले संदीप गावडे यांचे आहेत.तसं वैशाली संदीप गावडे राहणार निमगाव बोडखा या मातापित्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर सातत्याने वेगवेगळे कला कौशल्य अध्यापनाच्या बाबतीत धडे दिले जातात. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गावडे यांची ही नात असून वडील संदीप गावडे हे गणेश विद्यालयात शिक्षक आहेत.यशस्वी या विद्यार्थिनींना अध्यापन करण्याची वैशिष्ट्यपूर्ण कला जामखेड येथील विशेष अध्यापक सुरेश गरजे यांच्या माध्यमातून अवगत झाली आहे.गावडे सर यांच्या घरी सुरेश गर्जे सर दर रविवारी दोन तास हा वर्ग घेऊन कलेचे शिक्षण देत असत. त्यांच्याकडे अध्ययनासाठी सध्या सहा विद्यार्थी असून यशश्री गावडे ही एका महिन्यातील चार दिवसात अशी कला अवगत करू शकली. याचा अत्यंत प्रत्यक्ष अनुभव घेण्यात आला.डोळे बांधून वर्तमानपत्र वाचून तिने दाखवले तसेच विविध नोटावरचे नंबर सुद्धा तिने डोळ्याला रुमाल बांधल्यानंतर ही सांगितले.दरम्यान,ही अत्यंत अद्भुत कला आठ वर्षाच्या यशश्री गावडे हिने शिकली आहे‌.याचा आज प्रत्यक्ष प्रयोग माजी आ. भीमराव धोंडे,पत्रकार उत्तम बोडखे,यशश्रीचे आजोबा पांडुरंग गावडे,वडील संदीप गावडे आणि इतरांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला.या कलेबद्दल यशश्री गावडे हिचे सर्वांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या