

आष्टी (प्रतिनिधी)
मी ज्या ठिकाणी गुरे राखले,खेळलो बागडलो त्या ठिकाणी रस्ता
नव्हता पिण्यास पाणी नव्हते. जनावरे व माणसांना एकाच विज विहरातील पाणी प्यावे लागत
होते.अशा दुर्गम व माळरानावर आपण २०१० साली रामगड देवस्थानची स्थापना केली.एक
लिंबाचे मोठे झाड ही या गडाची खूण होती.आज येथे सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने
रस्ता झाला.पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप,कीर्तनमंडप झाला आहे.खासदार,आमदार ,राजकीय
नेते, पदाधिका-यांच्या मदतीने मोठा निधी मिळालेला आहे.दानशुर भक्तांनी व
शिष्यगणांनी दिलेल्या देणगीतुन अल्पावधीत श्री श्रेत्र रामगड नावारुपाला आला
आहे.अल्पावधीत श्रेत्र रामगड देवस्थानचा संतकृपेने,नेत्यांच्या आणि भाविकांच्या
मदतीने विकास झाला असल्याचे प्रतिपादन रामगड देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.विष्णु
महाराज लिंबोडीकर यांनी केले. आष्टी तालुक्यातील लिंबोडी - देविनिमगाव या संत
बाळुदेव महाराज यांंच्या पावन भुमीत संत मदन महाराज यांंच्या
कृपाशीर्वादाने,राष्ट्रसंत वामनभाऊ व राष्ट्रसंत भगवानबाबा यांंच्या कृपेने श्री
क्षेत्र रामगड येथे सप्ताहातील काल्याचे कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आष्टी
तहसिल कार्यालयातील पेशकार भगीरथ धारक,राम महाराज,बाबुराव पाटील सुर्यवंशी,जेष्ठ
पत्रकार उत्तम बोडखे,राजेंद्र लाड सर,ह.भ.प.हरिदास महाराज चाटे,ह.भ.प.आदिनाथ महाराज
गुणारे,ह.भ.प.श्याम महाराज गव्हाणे, ह.भ.प. भरत महाराज आघाव, ह.भ.प. अशोक महाराज
काकडे,ह.भ.प.नवनाथ महाराज भारती,ह.भ.प. शिवाजी महाराज फिस्के,ह.भ.प.अशोक महाराज
जठार,सचिनबाप्पा गोंदकर, माजी सरपंच समाधान आंधळे,विजय घुगे,कर्डीले,हरिनाना
शिंदे,डाॕ.दादा अनारसे,बबन धोंडगे आदि सामाजिक, राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर
उपस्थित होते. रामगड येथे गाथा पारायण,रामायण व संतचरित्र कथा ज्ञानयज्ञ व अखंड
हरिनाम सप्ताह दि.१७ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत संपन्न झाला.या सप्ताहात
ह.भ.प.धर्माचार्य आजिनाथ आंधळे महाराज,रामायणाचार्य ह.भ.प.सुदाम महाराज ,ह.भ.प.उमेश
महाराज पुरी,ह.भ.प.रामकृष्ण महाराज, भागवताचार्य ह.भ.प.रोहिदास
महाराज,ह.भ.प.ब्रम्हचैतन्य तावरे महाराज,ह.भ.प.संजय महाराज यांचे हरिकीर्तन झाले.
आष्टी तालुक्यातील देविनिमगाव -लिंबोडी या परिसरात असलेले रामगड देवस्थान सध्या
चर्चेत आले आहे.या देवस्थानचे महंत विष्णु महाराज लिंबोडीकर यांंच्या
मार्गदर्शनाखाली रामकथा व भव्य दिव्य सप्ताह झाला. या सप्ताहातील काल्याचे कीर्तनास
हजारो भाविकांच्या उपस्थिती होती. यावेळी ह.भ.प.विष्णु महाराज लिंबोडीकर यांनी "
संत तुकाराम महाराज यांंच्या अभंगावर निरुपन केले.परमार्थात शुध्द चित्ताला महत्त्व
असते.शुध्द चित्त असणाऱ्या माणसात देव रहत असतो.रामगड देवस्थान १५ वर्षापुर्वी
दुर्गम व रस्ता नसलेल्या ठिकाणी स्थापन केले होते.साधु संत,महंत राजकीय,सामाजिक व
प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्य व मदतीने हे संस्थान विकसीत होत
आहे.जीवन आहे तोपर्यत चांगले वागा.चांगले वागणाऱ्यांना मोक्ष तर वाईट वागणाऱ्यांना
नरक प्राप्तीच असते.नामयज्ञ, सप्ताह हे पुण्यासाठी असतात. परमार्थ व संसार वेगळा
नाही.दोन्ही क्षेत्रात माणसांना एकत्रीत यावे लागते.परमार्थ करण्यासाठी शुध्द भाव व
ओढ लागते.आचार, विचार व तत्त्व या तीन गोष्टी एकत्रीत आले की ते मित्र होत असतात.आई
-वडिलांची सेवा, गायीची सेवा आणि देशाची सेवा केली की ती देवाची सेवा होत असते.
जन्मदाती माता,गोमाता आणि पृथ्वी माता या तीन माता आहेत. आईबापाची सेवा करणे म्हणजे
पृथ्वी प्रदिक्षणा होत असते.याला शास्राचा आधार आहे. संताचे प्रमाण आहे.अनुभव नसेल
तर संसार व परमार्थात ती आडचण असते.पोटाची भुक,ज्ञानाची भुक आणि धन व मानाची भुक
अशा तीन भुका असतात. जीवनात काही नाही मिळले तरी खचुन जायचं नाही.वेळ निघुन जात
असते.हे लक्षात ठेवा..मग नैराश्यातील माणुस देखील आत्महत्या करीत नाहीत.
*चौकट*
------------
यावेळी रामगड देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.विष्णु महाराज यांच्या हस्ते
आदर्श पत्रकार म्हणुन जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, प्रशासाकीय सेवेतील आदर्श अधिकारी
म्हणुन आष्टी तहसिल कार्यालयात अव्वल कारकुन पेशकार भगीरथ धारक आणि पशुवैद्यकीय
सेवेबद्दल डाॕ.हरिभाऊ दराडे यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
*चौकट*
-------------
खा.डाॕ.प्रितमताई मुंडे १० लाख रु,आ.बाळासाहेब आजबे ५ लाख व माजी
आ.भीमराव धोंडे यांनी ३ लाख रु देवस्थानचे विकास कामांसाठी दिले आहेत.समाजसेवक विजय
गोल्हार यांनी प्रयत्न करुन हे देवस्थान " क " दर्जात आणले आहे. यासर्व राजकीय
नेत्यांचे ह.भ.प.विष्णु महाराज लिंबोडीकर यांनी आभार मानले.
---------------------------
0 टिप्पण्या