सातारा (प्रतिनिधी) स्त्रीमुक्तीच्या उद्गात्या,समता,बंधुत्व, ऐक्य सर्वधर्मसमभाव
या मूल्यांना खऱ्या अर्थाने समाजात रूजवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित
करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जन्मभूमी असलेल्या नायगाव (चेतना
भूमी) या पवित्र ठिकाणी बीड जिल्ह्याचे पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार तथा
उपसंपादक उत्तम बोडखे यांच्या कुटुंबीयांनी आज रविवारी भेट देत जन्मभूमी नायगाव
येथील ऐतिहासिक ठेवा असलेल्या सावित्रीमाईंच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
समतेच्या माध्यमातून देशभरात मानवी जीवनात क्रांती करणाऱ्या फुले दाम्पत्यांचे एक
वेगळे स्थान आहे.चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांनी केलेले कार्य कायम प्रत्येकाच्या
मनामध्ये राहणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी तत्कालीन स्थितीमध्ये दुष्काळात
उघडलेले अन्नछत्र,विधवांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना तसेच महत्त्वाचे म्हणजे
चार वर्षात १८ शाळा त्यांनी सुरु करुन स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुले केले
होते.सत्यशोधकी विवाह पद्धती सुरू केली.एकूणच,मानवी जीवनातील विषमता नाहीसी
करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.अशा या क्रांतिकारी
ज्ञानज्योती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळी आलेल्या प्लेगच्या साथीत
इतरांचा जीव वाचवताना स्वतःचा जीव अर्पण केला.अशा ज्ञानज्योती, क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमी असलेला नायगाव (चेतना भूमी) येथे आज रविवारी
जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्या सौभाग्यवती शिक्षिका बबीताताई बोडखे यांनी
राष्ट्रीय ऐतिहासिक ठेवा असलेल्या पुण्यभूमी येथे नतमस्तक होत महात्मा ज्योतिराव
फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे विनम्र भावनेने दर्शन घेऊन आशीर्वाद
घेतले. -------------------------------
0 टिप्पण्या