Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे रिपाइंनेते अरुणभैय्या निकाळजे यांचा आजी,माजी आमदारांच्या हस्ते " सच्चा कार्यकर्ता " पुरस्काराने गौरव

आष्टी (प्रतिनिधी) विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या. जयंतीनिमित्त आष्टी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे जयंती महोत्सव समितीतर्फे दिवंगत रघुनाथ (बंधू) निकाळजे सामाजिक स्मृती पुरस्कार आ.बाळासाहेब आजबे,माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,तहसिलदार प्रमोद गायकवाड, युवानेते जयदत्त धस,पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस,सतीशआबा शिंदे, वाल्मिकतात्या निकाळजे,अशोक साळवे,रत्नदीप निकाळजे,साहेबराव म्हस्के ,नामदेव राऊत,भगीरथ धारक शासन, पत्रकार उत्तम बोडखे,रुपेश निकाळजे,चेअरमन आदिनाथ सानप , बाबुराव अनारसे,सरपंच परिवंत गायकवाड,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,सादिक कुरेशी,सतिष गायकवाड,हनुमंत शिंदे, महादेव तांदळे,दिपक निकाळजे, अशोक निकाळजे,बी.वाय.निकाळजे, राहुल निकाळजे,गौतम निकाळजे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षीचा हा पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणभैय्या निकाळजे यांना देण्यात आला.अरुणभैय्या निकाळजे यांनी सन १९८२ पासून दलीत आंबेडकरी चळवळीत सक्रीय कार्य सुरु केले. पँथरसारख्या आक्रमक संघटनेची स्थापना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली झाली,दलित चळवळीच्या माध्यमातून गायरान चळवळ विद्यापीठ नामांतर चळवळ, आष्टी तालुक्यातील अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.चळवळीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडवले. आंबेडकरी विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पॅंथर संघटना विसर्जित झाल्यानंतर रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आष्टी तालुका उपाध्यक्ष म्हणून या राजकीय संघटनेत काम सुरू केले. चळवळी बरोबरच पंचायत समिती आष्टीचे उपसभापतीपद, आष्टी शहराचे सरपंचपद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद, कडा साखर कारखान्याचे संचालकपद अशा विविध पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. विद्यापीठ नामांतर चळवळीचा आंदोलनामध्ये व पॅंथर चळवळीने दरम्यान त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले.या प्रामाणिक सच्चा कार्यकर्त्यास आज भीमजयंती महोत्सव समितीच्यावतीने आ. बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर,युवानेते जयदत्त धस,सतीशआबा शिंदे जयंती महोत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे प्रदान करण्यात आला.यावेळी वाल्मिकतात्या निकाळजे,अशोकराव साळवे, रत्नदीप निकाळजे,सरपंच परिवंत गायकवाड,रुपेश निकाळजे, माजी नगरसेवक दिपक निकाळजे,माजी नगरसेवक सादिक कुरेशी,राजू निकाळजे,पत्रकार सचिन रानडे,पत्रकार गणेश दळवी,पत्रकार अण्णासाहेब साबळे,जयंती कमिटीचे अध्यक्ष अशोक निकाळजे,डॉ.युवराज तुपेरे, कुणाल निकाळजे,सनी काळपुंड,प्राचार्य सुनील शिंदे सर, सचिन निकाळजे सर, प्रदीप पगारे,मिलिंद निकाळजे सर,शशिकांत निकाळजे,योगेश तुपेरे आदींसह हजारो भीमसैनिक,नागरिक, व्यापारी सर्व क्षेत्रातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा पुरस्कार मिळाल्यामुळे अरुणभैय्या निकाळजे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या