Ticker

6/recent/ticker-posts

प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे यांना पितृशोक

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे यांचे वडील रावसाहेब भाऊसाहेब निंबोरे (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने दि.२२ एप्रिल २०२४ रोजी निधन झाले. ते वारकरी संप्रदायाशी जोडले गेले असल्यामुळे ते धार्मिक वृत्तीचे होते.त्यांच्या प्रोत्साहनामुळे निंबोरे परिवारातील अनेकांनी शिक्षण घेऊन उच्चपदे ग्रहण केली.पंचक्रोशीत त्यांचा नावलौकिक होता.त्यांच्यावर पैसावस्ती,नागापूर, तालुका कर्जत तेथे सोमवार दि.२३ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे, सभापती बद्रीनाथ जगताप,प्राचार्य डॉ.कुदळे,प्राचार्य डाॕ. वाघ,तात्याराव जेवे,प्रा. भाऊसाहेब काळे, प्रा. अविनाश भवर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी आ. साहेबराव दरेकर,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,इंजि. तानाजी जंजिरे, प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ,प्राचार्य थोरवे, अतुल मेहेर, दिलीप वर्धमाने, डॉ.प्रताप गायकवाड, माजी उपप्राचार्य व्हि.एल.शिंदे,सुभान पठाण,प्रा.महेश चवरे, पी,ई. तळेकर (आप्पा), सुरेश पवार,डॉ. बाबासाहेब मुटकुळे,प्रा. अविनाश कंदले,प्रा. ज्ञानेश्वर नवले,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन, उत्तम बोडखे,कवी हरिष हातवटे,महेश सावंत, लक्ष्मण रेडेकर,श्रीमती सरस्वती जाधव,प्रा.विष्णू चौधरी,प्रा.अशोक भोगाडे,डॉ.अभय शिंदे,प्रा.चंद्रकांत मडके,प्रा.सचिन कल्याणकर,प्रा.संजय कोल्हे,प्रा.चंद्रकांत कोकणे,अनिल जगदाळे,डॉ.रवी सातभाई,प्रा.आनंद देशमुखे,प्रा.जितेंद्र राळेभात,काका शिंदे, बीड आणि नगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नेते,व्यापारी, डॉक्टर,वकील,शेतीनिष्ठ शेतकरी,विविध समित्याचे चेअरमन,बँक अधिकारी,पत्रकार,मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंत्यविधीसाठी जनसागर लोटला.त्यांच्या मागे दोन मुले,एक मुलगी,तीन भाऊ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या