Ticker

6/recent/ticker-posts

आज हनुमंतगाव येथे ह.भ.प.बबन महाराज यांचे काल्याचे कीर्तन ............................................. महाप्रसादाच्या महापंगतीस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ......................................... संतोषशेठ मेहेर, विजयशेठ मेहेर

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथे श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सवनिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी वै.संत मदन महाराज बिहाणी यांच्या कृपा आशीर्वादाने व ह.भ.प.आजिनाथ महाराज झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह दि.१७ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मेहेर ज्वेलर्स सोन्या,चांदीचे आष्टीचे व्यापारी स्व.पु.प्यारीबाई गोकुळदासजी मेहेर आणि स्व.जयकुमार मेहेर यांचे स्मरणार्थ संतोषशेठ मेहेर,विजशेठ मेहेर यांंच्या मेहेर ज्वेलर्सच्यावतीने आज दि.२४ एप्रिल रोजी सप्ताहातील महाप्रसादाची महापंगत होत आहे.या कीर्तनाचा व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मेहेर बंधुंनी केले आहे. व्यासपीठ चालक म्हणुन ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पारखे,ह.भ.प. झुंबर महाराज,श्रीरंग मदने हे काम पाहत आहेत.या सप्ताहात ह.भ.प. शिवाजी महाराज कोकणे, ह.भ.प.सुनील महाराज झांबरे, भागवताचार्या ह.भ.प. प्रतिक्षाताई महाराज करडुळे (बीड) ,ह.भ.प. संजिवनीताई महाराज शिगाडे,ह.भ.प.नागनाथ महाराज काळे,ह.भ.प. यशवंत महाराज कदम ह.भ.प.पांडुरंग महाराज यांचे हरिकीर्तन झाले. आज बुधवार दि.२४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.त्यानंतर मेहेर बंधु यांच्यावतीने महाप्रसाद वाटप होणार आहे. हनुमंतगाव येथील हनुमान सेवा मंडळ, समस्त गांवकरी मंडळी यांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या