आष्टी ( प्रतिनिधी )
आष्टी तालुक्यातील कडा येथील मोहटादेवी मंदिराच्या ३२ व्या.
वर्धापन दिनानिमित्त ६ ते १३ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत
कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कडा येथे नगर जामखेड रस्त्याला वीज उपकेंद्राजवळ देवी
भक्त भगवानराव वाघुले यांनी स्थापन केलेले मोहटादेवी मंदिर आहे . या मंदिराच्या
वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी एप्रिल महिन्यात हरिनाम सप्ताह व इतर कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात येते . यावर्षी ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात
आले आहे. गुरुवार दि.४ एप्रिल रोजी कडा येथून मोहटादेवी ( ता.पाथर्डी ) येथे पायी
पालखी दिंडी जाईल. शुक्रवारी सकाळी मोहटादेवी येथून दर्शन घेऊन पालखी परत कडा येथे
येईल.शनिवार दि.६ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता कडा येथील मंदिरात कलश पूजन कार्यक्रम
होईल. त्यानंतर दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत प्रा महेश क्षीरसागर यांचे देवी
अवतारकथा प्रवचन होईल. संध्याकाळी सहा ते आठ हरिपाठ होईल. त्यानंतर रात्री सात ते
साडेआठ या वेळेत भागवत महापुराण कथा होईल. या कथेचे प्रवक्ते ह.भ.प. निळकंठ महाराज
तावरे हे असणार आहेत.रात्री साडेआठ वाजता महाप्रसाद होईल. शुक्रवार दि.१२ एप्रिल
रोजी रात्री आराधी व गोंधळी यांचा गायनाचा कार्यक्रम होईल. शनिवारी पहाटे देवीला
अभिषेक व होम हवन होईल. त्यानंतर देवीच्या पालखीची मिरवणूक होईल. याच दिवशी सकाळी
१० वाजता ह .भ. प. बबन महाराज बहिरवाल यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची
सांगता होईल . या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात
आले आहे.
0 टिप्पण्या