आष्टी (प्रतिनिधी)
राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत आष्टी तालुक्यातील बावी
येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादित केल्याने
ज्यांच्या मार्फत ही परीक्षा राज्यभर घेतली जाते त्या कोल्हापूर एज्युकेशन
सोसायटीचे, गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेचे संस्थापक श्री. किरण शशिकांत चौगुले यांनी
स्वामी विवेकानंद विद्यालय येथे भेट देऊन राज्यात,जिल्ह्यात व तालुक्यात आलेल्या
विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळेवर येऊन अभिनंदन केले. राज्यभर ही परीक्षा एकाचवेळी
अतिशय प्रभावीपणे पार पाडली जाते, या परीक्षेस शाळेतील 145 विध्यार्थी बसले होते
त्यापैकी राज्यात 75 व तालुक्यात आणि जिल्ह्यात मिळून शेकडो विध्यार्थ्यांनी
उत्कृष्ट गुण प्राप्त केल्याने या परीक्षेचे सर्वेसर्वा अध्यक्ष श्री. किरण शशिकांत
चौगुले यांनी शाळेवर भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील
शाळेचे स्पर्धा परीक्षांमधील हे यश अभिमानास्पद असून पालक व शिक्षणप्रेमी
व्यक्तींकडून याबाबत कौतुक केले जात आहे. या शैक्षणिक वर्षभरात 2023 -2024 मध्ये
स्वामी विवेकानंद विद्यालयाचे स्पर्धा परीक्षांमधील यश अभूतपूर्व असून या शाळेतील 1
विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश पात्र झाला असून इ.5 वी चे 10 विध्यार्थी
शिष्यवृत्ती पात्र तर 7 विध्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले असून मंथन प्रज्ञाशोध
परीक्षेत ही या शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले
असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या शाळेच्या माध्यमातून आपल्याच परिसरात
दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे हे मात्र निश्चित!
0 टिप्पण्या