Ticker

6/recent/ticker-posts

जालींदर गायकवाड कामाशी निष्ठावान व शांतताप्रिय कर्मचारी ......... माजी आ.साहेबराव दरेकर

आष्टी (प्रतिनिधी ) आष्टी पंचायत समितीतील कर्तव्यदक्ष आणि कामावर निस्मीम प्रेम करणारे सर्व अधिकाऱ्यांशी आदराने वर्तन ठेवलेले जालींदर गायकवाड आहेत. प्रामाणिक आणि निष्ठावान सेवक म्हणुन म्हणून जालिंदर गायकवाड यांनी काम केलेले आहे.जालींदर गायकवाड कामाशी निष्ठावान व शांतताप्रिय कर्मचारी आहेत असे गौरोवोद्गार माजी आ.साहेबराव दरेकर यांनी काढले. आष्टी पंचायत समितीत जालींदर गायकवाड यांनी सेवक म्हणून ३६ वर्ष सेवा केल्यानंतर ६० वर्षे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने आयोजित सेवापूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. आष्टी येथील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे दि. २ मार्च रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रभाकर अनंत्रे हे होते.यावेळी माजी आ. साहेबराव दरेकर, यशभैय्या आजबे, वाल्मिकतात्या निकाळजे, समाजसेवक विजय गोल्हार, माजी उपसभापती चेअरमन आदिनाथ सानप, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रभाकर अनंत्रे,अरुणभैय्या निकाळजे,नामदेव राऊत, बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे,सेवानिवृत्त उपअभियंता पी.ई तळेकर,रत्नदिप निकाळजे,माजी नगरसेवक दिपक निकाळजे ,माजी गटविकास अधिकारी बबनराव खंडागळे,गोरख सायकड, ग्रामसेवक नवनाथ लोंढे,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,पोपट घुले, रामराव झांजे,प्रा.सुभाष रासकर,दत्ताभाऊ बोडखे, नवनाथ सावंत, राहुल सदाफुले,परिवंत गायकवाड, सरपंच सौ.वंदनाताई गायकवाड,माजी सरपंच केशव बांगर, नवनाथ विधाते, सतिषकुमार गायकवाड, इंजी.प्रविण वारे,जगेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, अभिषेक गायकवाड, लक्ष्मण बांगर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालींदर गायकवाड यांची कन्या ग्रामसेविका दिपाली सदाफुले यांनी केले. यावेळी वाल्मिकतात्या निकाळजे,विजय गोल्हार,सहाय्यक गटविकास आधिकारी प्रभाकर अनंत्रे,चेअरमन आदिनाथ सानप,नामदेव राऊत,प्रा.सुभाष रासकर ,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,दिपक निकाळजे,महालींग निकाळजे ,रत्नदीप निकाळजे यांची भाषणे झाले. यावेळी सत्कारमुर्ती जालिंदर गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी गायकवाड यांनी तणावमुक्त जीवन शैली आत्मसात करावी कर्तव्याप्रती प्रामाणिक राहण्याचा संदेश देऊन त्यांच्यासोबत आलेले अनुभव सांगून गायकवाड यांच्याविषयी विषयी कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांनी गायकवाड यांचे भावी आयुष्य आरोग्यदायी जावो अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद निकाळजे सर यांनी केले तर आभार सतिषकुमार गायकवाड,अभिषेक गायकवाड यांनी मानले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या