Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांचा आणखी एक कौतुकास्पद निर्णय

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरात मुस्लीम बांधवांची ब-यापैकी संख्या आहे.आष्टी नगरपंचायतीत सहा नगरसेवक आहेत.परंतु हिंदु धर्मियांच्या भावना दुखवणार नाहीत ऊलट आषाढी एकादशी असो गणेश चतुर्थी असो किंवा उद्या होणारा महावीर जयंती सोहळा असो मुस्लीम समाजातील जबाबदार आणि सोशल टच असलेले सामाजिक कार्यकर्ते एकत्रीत येऊन मांसविक्रि अथवा मटन विक्री बंद ठेवुन चांगला संदेश देतात.याच धर्तीवर आष्टी शहरात जैन धर्मातील महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती आष्टी शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.यामुळे आष्टी शहरात आज रविवार दि. २१ एप्रिल रोजी महावीर जंयतीनिमित्त दिवसभर मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आष्टी नगर पंचायतच्यावतीने घेण्यात आला असल्याची माहिती आष्टी नगर पंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली. आष्टी शहरात जैन धर्मातील महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.याच पार्श्वभूमीवर शहरातील रविवार दि.२१ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी होणार आहे.यामुळे आष्टी शहरातील रविवार दि. २१ एप्रिल रोजी महावीर जंयतीनिमित्त दिवसभर मटण,चिकन,मासे,विक्री करणारे सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मांसविक्री होणार नाही.असा निर्णय आष्टी नगरपंचायत यांनी निर्णय घेतला आहे.या आदेशाचे विक्रेत्यांनी पालन करावे असे आवाहनही नगराध्यक्ष जिया बेग यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या