Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत धामणगावचे निलेश मुनोतचे सुयश

((आष्टी प्रतिनिधी )) आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील निलेश नंदलाल मुनोत या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परीक्षेत सुयश मिळवले आहे.निलेश मुनोत यास ९१६ वी. रँक मिळाली आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशासन सेवेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील युवक निलेश नंदलाल मुनोत याने यश मिळवले तो आता केंद्र शासनाच्या वर्ग एक पदासाठी पात्र ठरला आहे.धामणगाव येथे जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर निलेश याने कडा येथील अमोलक शिक्षण संस्थेच्या पीएम मुनोत जुनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.त्यानंतर नगर जवळील रायसोनी कॉलेजमधून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली.पुण्यात नोकरी करत असताना मित्रांमुळे स्पर्धा परीक्षांची माहिती झाली.त्याची तयारी करत असताना निलेश याने यूपीएससीसाठी प्रयत्न सुरू केले.अखेर पाचव्या प्रयत्नात निलेश याला यश मिळाले.९१६ वी. रँक घेऊन तो या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.आष्टी तालुक्यातील डॉ.संदीप पांडुळे यांनी यापूर्वी यूपीएससीमध्ये यश मिळवले होते.त्यानंतर या परीक्षेत पात्र होणारा निलेश हा दुसरा व्यक्ती ठरला आहे. निलेश मुनोत यांच्या यशाबद्दल आष्टी तालुक्यातून त्याचे अभिनंदन होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या