
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील नवजीवन फाऊंडेशन संचलित नवजीवन संगोपन केंद्रातील
अनाथ, निराधार,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार, आदिवासी,भटके विमुक्त,
गरीब,वंचित,दुर्लक्षित घटकातील मुलांचा मोफत सांभाळ करून शिक्षण दिले जाते.या
नवजीवन संगोपन केंद्रास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत मिळत नाही.हे
केंद्र समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि मदतीतून चालवले जात आहे.या
अनाथ, निराधार मुलांना फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी.आपणही समाजाचे काही देणे
लागतो या भावनेने आष्टी तालुक्यातील वटनवाडी येथील युवा नेते किरण शिनगीरे यांनी
अनावश्यक खर्च टाळून नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब,अनाथ निराधार मुलांना
शालेय साहित्य,खेळणी साहित्य आणि खाऊ देऊन सामाजिक उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा
केला.या कार्यक्रमास किरण शिनगीरे,संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक शशिकांत
कन्हेरे,बळीराम शिनगीरे, आण्णा नरवडे,कार्तिक भोसले,अजय शिनगिरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नवजीवन संगोपन केंद्र संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर
यांनी आभार मानले वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती सोशल मीडिया व प्रत्यक्ष भेटून
शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.यामध्ये कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक
रामशेठ मधुरकर,पत्रकार उत्तम बोडखे,भगवान शिनगीरे,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल
सहस्रबुद्धे, माजी सरपंच सतीशशेठ धस, संस्थाचालक वैजिनाथ निर्मळ,संचालक दिलीप
वायबसे,अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष कांतीलाल चानोदिया,उपाध्यक्ष
बिपिन भंडारी, कोषाध्यक्ष डॉ.उमेश गांधी,डॉ.महेंद्र पटवा, प्रवीण पोकळे,अविनाश
कदम,माजी सरपंच विठ्ठल राख,माजी चेअरमन अनिल वांढरे, भरत जाधव,डॉ.महेश नाथ,
डॉ.युवराज तरटे, सरपंच संदीप मार्कंडे, माजी सरपंच अर्जुन मैंद, माजी सरपंच छगन
शिनगिरे,माजी सरपंच नवनाथ नागरगोजे,माजी सरपंच राम धुमाळ, उपसरपंच युवराज
मुटकुळे,पत्रकार रामदास जाधव, निसार शेख, जावेद पठाण,राजेंद्र लाड,अक्षय विधाते,
संजय खंडागळे, समीर शेख, संतोष नागरगोजे, मनोज पोकळे, दत्ताभाऊ बोडखे,प्रा.जमीर
सय्यद, प्रा.विष्णू गव्हाणे, प्रा.तुकाराम गोंदकर, प्रा. सोमनाथ हासे, डॉ. राजकुमार
थोरवे, बाळासाहेब खकाळ, विजय खकाळ,अशोक तोतरे, बळीराम शिनगीरे, अण्णासाहेब नरवडे,
आकाश डोंगरे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या