Ticker

6/recent/ticker-posts

कासारी येथे संत शिवस्वरूप बन महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त उद्यापासुन हरिनाम सप्ताह सुरु

आष्टी (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे याही वर्षी आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र कासारी येथे श्री गुरूवर्य महान तपस्वी शिवस्वरूप बन महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमीत्त अखंड हरिनाम सप्ताह व कळस रोहन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी ४६ वा.अखंड हरिनाम सप्ताह सोहळा होत आहे.आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र कासारी येथे संत शिवस्वरूप बन महाराज यांच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त दि.२९ एप्रिल ते ६ मे २०२४ या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.सुदर्शन मुनी उदासीन महाराज, ह.भ.प.संतोष महाराज मोरे,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे,ह.भ. प.शांती गिरी महाराज, ह.भ.प.केशव महाराज उखळीकर,ह.भ.प.उमेश महाराज दशरथे यांचे हरिकीर्तन होणार आहेत. दि.३० एप्रिल रोजी रात्री भारुडकार विष्णु महाराज बांडे यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.दि.२ मे रोजी रात्री भारुडकार बालाजी सिरसाट आणि दि.४ मे रोजी गोविंद महाराज गायकवाड (आळंदी) यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.रविवार दि. ५ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वा.होणार आहे.रात्री १२ वा. संजीवन समाधीवर फुलांचा वर्षाव होणार आहे.सोमवार दि.६ मे रोजी सकाळी ९ ते ११ यावेळात रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक महाराज यांंचे काल्याचे कीर्तन होणार आहे.सर्व भाविक भक्तांनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह आयोजन समितीने केले आहे. सप्ताहात श्रीराम कथा प्रवक्ते ह.भ.प. शिवाजी महाराज कोकणे हे आहेत.सिंथवादक ह.भ.प.कृष्णा महाराज भांड,कथा साथ संगत ह.भ.प.आदिनाथ महाराज गिरी,झाँकी - ह.भ.प.अश्विन महाराज नागपुरकर,तबला साथ ह.भ.प.रविंद्र महाराज डाडर हे कथा साथ संगत करणार आहेत.दिंडी प्रदक्षिणा व कळस मिरवणुक होणार आहे. काल्याचे कीर्तनप्रसंगी लोकनेत्या पंकजाताई मुंडे,आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे , माजी आ.साहेबराव दरेकर आदि राजकीय, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिसरातील भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संत शिवस्वरुप बन महाराज सप्ताह समिती,तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या