
आष्टी (प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर,
उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वत्रिक
लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने आदर्श आचारसंहितेमध्ये जिल्हा सरहद्दीवर चेक पोस्ट
तैनात करून जास्तीत जास्त अवैध दारू,अवैध पैसा आदि बेकायदेशीर वाहतूकीवर आळा
बसविण्याकरिता चेक पोस्ट अंभोरा येथे पोलीस स्टेशन अंभोरा प्रभारी अधिकारी मंगेश
साळवे,पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके,पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे,मुकुंद एकशिंगे,
पोलीस अंमलदार शिवदास केदार,बाळू जगदाळे,एसएसटी पथकातील पोलीस हवालदार संतोष
राठोड,पोलीस नाईक अमोल ढवळे असे नाकाबंदीमध्ये वाहनाची तपासणी करत असताना दोन वाहन
चालक त्यांच्या वाहनांमध्ये अवैद्य दारू वाहतूक करीत असताना मिळून आल्याने
त्यांच्याकडून १० लाख,९३ हजार ९५० रुपये किमतीची अवैद्य दारू व वाहने जप्त करण्यात
आली आहे. त्यांच्यावर दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.प्रभारी
अधिकारी पोलीस स्टेशन अंभोरा मंगेश साळवे यांनी या माध्यमातून नागरिकांना आवाहन
केले आहे की,सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श
आचारसंहितेचा कालावधी सुरु आहे.त्यादरम्यान जिल्हा सरहद्दीवरील तैनात करण्यात आलेले
चेक पोस्ट येथे वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.ज्या वाहनामधून अवैद्य वाहतूक
होत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आदर्श
आचारसंहितेचे पालन करावे.कोणीही वाहनांमध्ये अवैद्य वाहतूक करुन बेकायदेशीर कृत्य
करू नये अन्यथा कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील व अत्यंत कठोर कारवाईला सामोरे
जावे लागेल.
0 टिप्पण्या