
आष्टी (प्रतिनिधी )
अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीमध्ये प्रचंड मेहनत जिद्द आणि
चिकाटीच्या बळावर माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयीन परिक्षेतही उच्चतम गुणांची
टक्के मिळवल्यानंतर एमबीबीएस परीक्षेतही संकेत शांतीलाल जायभाये या गुणी
विद्यार्थ्यांने सलग चारही वर्ष ७० टक्के हून अधिक गुण घेत उत्कृष्ट यश संपादन केले
आहे.दरम्यान या यशाबद्दल डॉ.संकेत चे अभिनंदन होत आहे.डाॕ. संकेत जायभाये हा सेठ
जीएस मेडिकल मुंबई कॉलेजचा विद्यार्थी असून त्याने एमबीबीएसच्या प्रथम वर्षात ७३
टक्के, द्वितीय वर्षात ७३ टक्के, तृतीय वर्षात ७१ टक्के; तर चौथ्या अंतिम वर्षात ७३
टक्के गुण घेऊन एक कायम रेंज राखली आहे.प्रचंड जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर
त्याने एमबीबीएस उत्तम गुणांनी उत्तीर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण अर्थात
एमडीसाठी तो अभ्यास करीत आहे.या यशाबद्दल संकेत शांतीलाल जायभाये याचे अभिनंदन
सहकार व शिक्षण महर्षी रामकृष्ण बांगर, प्रगती शिक्षण संस्थेच्या सचिव तथा सामाजिक
कार्यकर्त्या प्राचार्य सत्यभामाताई बांगर,रा.यु.कां चे जिल्हा अध्यक्ष विजयसिंह
बांगर, मुख्याध्यापक दिलीप कंठाळे, प्राचार्य बी.टी.खाडे सर, प्राचार्य बी एस खाडे,
प्राचार्य तुकाराम तुपे, मुख्याध्यापक दिनकर काका बांगर, प्रगती विद्यालयाचे
मुख्याध्यापक आबासाहेब गोपाळघरे, मुख्याध्यापक एम.बी.सानप, महाराष्ट्राचे मुप्टा
असोसिएशनची बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.बिभिषण चाटे, प्रा.बी.के. मुंडे, गोरख
बांगर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या