Ticker

6/recent/ticker-posts

मंगळवारी पाटोदा येथे विठ्ठलगडाचे अध्यक्ष ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवेबापु यांचे काल्याचे कीर्तन ..................................................... महाराष्ट्राच्या अध्यात्मिक क्षेत्रातील नकाशावर विठ्ठलगड चमकला ............................... विठ्ठलगडाचा पहिलाच हरिनाम सप्ताह भव्यदिव्य

आष्टी (प्रतिनिधी) पाटोदा शहरापासुन १ कि.मि.अंतरावर समाजप्रबोधनकार,वैराग्यमुर्ती ह.भ.प. रामकृष्ण रंधवेबापु यांनी स्वताःचे २५ लाख रु खर्चुन उभारलेल्या श्री क्षेत्र विट्ठलगड येथे पहिल्याच वर्षी दि.२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण व भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत आहे.या सप्ताहात काकडा आरती, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा ज्ञानेश्वरी प्रवचन,हरिपाठ हरिकिर्तन,हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल झाली आहे.या सप्ताहात झी टाॕकीज फेम धर्माचार्य ह.भ.प.कैलास महाराज शेवाळे (मंचर - पुणे),भागवताचार्य ह.भ.प.नवनाथ महाराज फुटाणे (धारुर),अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले (डिकसळ),ह.भ.प. आसाराम महाराज बडे (आळंदी), बंकटस्वामी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे (निनगुर) यांचे हरिकीर्तन झाले.आज रविवार दि.२८ एप्रिल रोजी विठ्ठल संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.रामभाऊ महाराज राऊत (गंगापूर) यांचे तर उद्या सोमवार दि.२९ एप्रिल रोजी ॲड.जयवंत महाराज बोधले (पंढरपूर) यांचे हरिकीर्तन होणार आहे. मंगळवार दि.३० एप्रिल रोजी पाटोदा येथील विठ्ठलगडाचे अध्यक्ष समाजप्रबोधनकार वैराग्यमुर्ती ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवेबापु यांचे सकाळी १० ते १२ यावेळात काल्याचे कीर्तन होणार आहे. यावेळी राजकीय,सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक,कला,क्रिडा क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी आमदार,आजी माजी खासदार,माजी मंत्री,साधुसंत,महंत उपस्थित राहणार आहेत.या सप्ताहास भावीकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाजप्रबोधनकार तथा सप्ताहाचे आयोजक समाजप्रबोधनकार ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापु यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या