Ticker

6/recent/ticker-posts

उद्या धनगरवाडी - डोईठाण येथे उद्या महंत काशीनाथ महाराज यांंचे काल्याचे कीर्तन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील नागतळा येथील गणेशगड व नागनाथ संस्थानचे अध्यक्ष महंत काशीनाथ महाराज यांचा १२ वा.नारळी सप्ताह धनगरवाडी- डोईठाण येथे सुरु आहे. उद्या बुधवार दि.२४ एप्रिल रोजी नागतळा येथील श्री क्षेत्र नागनाथ देवस्थान व गणेशगड संस्थानचे अध्यक्ष महंत काशीनाथ महाराज यांंचे काल्याचे कीर्तन सकाळी १० ते १२ यावेळेत होणार आहे. या सप्ताहात संत मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष रामायणाचार्य ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांची संगीत रामकथा सुरु आहे साधु संतांच्या आशीर्वादाने आणि महंत काशीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धनगरवाडी येथे दि.१७ ते दि.२४ एप्रिल २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरु आहे.सप्ताहात टाळ, विणा,पखवाज,ग्रंथ पुजन झाले आहे. या सप्ताहात काकडाभजन,प्रवचन, विष्णु सहस्रनाम,गाथा भजन,दररोज दुपारी २ ते ५ पर्यत ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांची सुश्राव्य संगीत रामायण कथा सुरु आहे. सप्ताहात हरिपाठ, हरिकीर्तन होत आहे. या सप्ताहात ह.भ.प. प्रा.विजय महाराज राजपुरे (धनगरवाडी) यांचे प्रवचन,ह.भ.प. अशोक महाराज शास्री (गोविंदगड,हातोला) यांचे हरिकीर्तन,ह.भ.प.वशीष्ट महाराज तरटे (सर) (जय हरी प्रतिष्ठाण,डोईठाण) यांचे प्रवचन,ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर (कोरेगाव) कर्जत यांचे हरिकीर्तन, ह.भ.प.हरी महाराज शास्त्री ऋषीकेश (कारखेल बु.) यांचे प्रवचन,ह.भ.प. सोपान महाराज सानप (भागवताचार्य,हिंगोली) यांचे हरिकीर्तन,ह.भ.प. विश्वनाथ महाराज ननवरे रामायणाचार्य,अरणगांव यांचे प्रवचन तर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (बुलढाणा), ह.भ.प. चैतन्य महाराज कुंभार (गहिनीनाथगड) यांचे प्रवचन,ह.भ.प. सागर महाराज बोराटे (नातेपुते), ह.भ.प. बाबासाहेब महाराज महापुरे (जय हरी प्रतिष्ठाण,अहमदनगर) यांचे प्रवचन तर ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले (अखिल भारतीय वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांचे हरिकीर्तन झाले.आज मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी ह.भ.प. सुदर्शन मुनी महाराज उदासीन (श्री क्षेत्र सुदर्शन आश्रम, शिदेवाडी) यांंचे प्रवचन तर ह.भ.प.मंगेश महाराज वराडे (बुलढाणा) यांचे हरिकीर्तन.बुधवार दि. २४ एप्रिल रोजी नागतळा येथील श्री क्षेत्र नागनाथ देवस्थान व गणेशगड संस्थानचे अध्यक्ष महंत काशीनाथ महाराज यांंचे काल्याचे कीर्तन सकाळी १० ते १२ यावेळेत होणार आहे. नंतर महाप्रसाद होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या