Ticker

6/recent/ticker-posts

आज आष्टीत होणाऱ्या क्रांतिसूर्य म.फुले जयंतीस उपस्थीत रहावे .................... तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे

आष्टी (प्रतिनिधी) 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या जीवनभर सर्वसामान्य दीनदलित दुबळ्या, अनाथ ,अपंग, शेतकरी,शेतमजूर,वंचित घटकांना शिक्षणातून नवा तेजस्वी आयाम निर्माण करून दिला असे सांगून संस्कारक्षम ज्ञानातून समता आणि परिवर्तनाची अखंड ज्योत तेवत ठेवली असे प्रतिपादन महात्मा फुले समता परिषद आष्टी तालुकाध्यक्ष दत्ता बोडखे यांनी केले. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती उत्साहात साजरी केली जाते.आज गुरुवार दि.११ एप्रिल रोजी नगर - जामखेड रोड म.फुले चौक येथे सकाळी ९ वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभिवादन सभेस फुले अनुयानींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन महात्मा फुले समता परिषद आष्टी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या कित्येक वर्ष आधीपासून अंधश्रद्धा रूढी परंपरा आणि अज्ञानाच्या खाईत सापडलेल्या मानवी समाजव्यवस्थेची अत्यंत दुर्दैवी अवस्था पाहून महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणातून क्रांती घडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला अशा क्रांतिकारकांना विनम्र वंदन करत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून, अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या