आष्टी (प्रतिनिधी)

पाटोदा शहरापासुन १कि,मि.अंतरावर समाजप्रबोधनकार,वैराग्यमुर्ती
ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापु यांनी स्वखर्चाने ३५ लाख रु चे उभारलेल्या श्री क्षेत्र
विट्ठलगड येथे पहिल्याच वर्षी दि.२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत ज्ञानेश्वरी
पारायण व भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळा होत आहे. या सप्ताहात काकडा आरती,
विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा ज्ञानेश्वरी प्रवचन,हरिपाठ हरिकिर्तन,
हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. पहिले कीर्तन दि.२३ एप्रिल
रोजी झी टाॕकीज फेम धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे (मंचर - पुणे),दि.२४
एप्रिल रोजी भागवताचार्य ह.भ.प.नवनाथ महाराज फुटाणे (धारुर),दि.२५ एप्रिल रोजी
अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले (डिकसळ),दि.२६
एप्रिल रोजी ह.भ.प.आसाराम महाराज बडे (आळंदी), दि.२७ एप्रिल रोजी बंकटस्विमी
संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे (निनगुर), दि.२८ एप्रिल रोजी विठ्ठल
संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.रामभाऊ महाराज राऊत (गंगापूर), दि.२९ एप्रिल रोजी ॲड.जयवंत
महाराज बोधले (पंढरपूर) यांचे हरिकीर्तन होणार आहेत. मंगळवार दि.३० एप्रिल रोजी
पाटोदा येथील विठ्ठलगडाचे अध्यक्ष समाजप्रबोधनकार वैराग्यमुर्ती ह.भ.प. रामकृष्ण
महाराज रंधवेबापु यांचे सकाळी १० ते १२ यावेळात काल्याचे कीर्तन होणार आहे.यावेळी
राजकीय, सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक ,कला,क्रिडा क्षेत्रातील मान्यवर ,आजी माजी
आमदार ,आजी माजी खासदार,माजी मंत्री ,साधुसंत,महंत उपस्थित राहणार आहेत.या सप्ताहास
भावीकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाजप्रबोधनकार तथा
सप्ताहाचे आयोजक ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापु यांनी केले आहे.
0 टिप्पण्या