Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीची उजमा शेख पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण

आष्टी( प्रतिनिधी ) तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हंबर्डे महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.उजमा सलीम शेख हिने बालपणापासूनच खडतर प्रवास झेलला.वडील सलीम शेख यांचे २७ वर्षांपूर्वी म्हणजे,ती चार वर्षाची असताना छत्र हरपले.आई शालेय पोषण आहाराचा भात शिजवण्याचे काम करते.तिची जिद्द,चिकाटी डोळे दिपवून टाकणारी आहे.तिने बाथरूमलाच लायब्ररी करून सोळा..सोळा तास अभ्यास केला.आज एमपीएससीद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत तिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. कु.उजमा सलीम शेख आष्टी येथील आझाद नगर भागात राहते.प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्या प्रशाला,आष्टी येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण आष्टीच्या हंबर्डे महाविद्यालयात झाले.तिने यशस्वी होण्याची मनाशी खुणगाठ बांधली होती.संघर्ष यात्री उजमाचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या उत्तुंग यशाबद्दल संस्थाध्यक्ष किशोर हंबर्डे,सचिव अतुल मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.गणेश पिसाळ,सुभान शेठ पठाण,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे,उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,पर्यवेक्षक अशोक भोगाडे, कार्यालयीन अधिक्षिका सरस्वती जाधव,डॉ.अभय शिंदे,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,प्रा.आनंद देशमुखे, पत्रकार उत्तम बोडखे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,
अविनाश कदम,जावेद पठाण,संतोष दाणी,मुजाहिद्दीन,डॉ.बबन उकले यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या