Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा निवडणूक शांततेत आणि निःपक्षपाती होण्यासाठी कठोर उपाय योजना करावी ............. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे

आष्टी (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणूक शांततापूर्ण वातावरण आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने कठोर उपाय योजना कराव्यात अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिल्या आहेत.आष्टी तहसील कार्यालयामध्ये आयोजित सर्व खाते प्रमुखांच्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या आगामी लोकसभा निवडणूक कालावधीमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवावा मतदान अत्यंत पवित्र असा हक्क असून तो सर्व घटकांनी बजावावा मतदाना ऐवजी सुट्टी मध्ये सहलीला जाण्यास टाळावे आणि मतदान उपस्थित रहावे असे आवाहन करून त्यांनी सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारत निवडणूक आयोगा नुसार असलेल्या आदर्श आचारसंहिते चे काटेकोर पालन करावे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने ही निवडणूक अत्यंत शांततामय वातावरणात आणि नि:पक्षपातीपणे पार पडावी यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात अशा सूचना दिल्या.आचार संहिता लागू झाल्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या सर्व शस्त्रास्त्र परवाने धारकांची अग्निशस्त्रे पोलीस ठाण्यात तात्काळ जमा करावीत असे सांगून याबाबत अत्यंत दक्ष राहण्याचे आदेश दिले आष्टी येथे आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ३९ बीड सार्वत्रिक लोकसभा निवडणूक अंतर्गत २३१ आष्टी विधानसभा मतदारसंघात अंतर्गत निवडणूक प्रक्रियेतील आणि नियुक्त केलेल्या विविध टीम यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व कर्मचारी आणि पथक प्रमुख यांना निवडणूक प्रक्रिये बाबत मार्गदर्शन केले आष्टी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमधील नियोजित मतदान पेट्या ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून समाधान व्यक्त केले त्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आष्टी तालुक्यातील पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांची पाहणी करून अवैध पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले त्या अगोदर आष्टी तहसील कार्यालयात प्रवेश करताच त्यांनी थेट प्रवेश करून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी करून विचारले की, तुम्ही अर्ज दिल्यानंतर किती दिवसांनी प्रमाणपत्र मिळते ? अशी चौकशी केली असता त्यावर उपस्थित त्यांनी अभिलेख विभागातील कर्मचारी याबाबत अत्यंत संवेदनशील तात्काळ कागदपत्रांची पूर्तता केली जाते याबाबत समाधानी असल्याचे सांगितले. या बैठकीसाठी पाटोदा उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे,आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर,आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड, नायब तहसीलदार बाळदत्त मोरे,निवडणूक विभाग अव्वल कारकून राजेंद्र पवार,पाटोद्याचे तहसीलदार दत्तात्रय निलावाड, आणि शिरूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार बाळासाहेब खेडकर आष्टीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, विशेष शाखेचे सद्दाम शेख, तालुका कृषी अधिकारी गोरक्ष तरटे यांचे सह विविध कार्यालयाचे खाते प्रमुख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या