आष्टी (प्रतिनिधी)
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून भारत निवडणूक
आयोगाद्वारे सर्व राजकीय पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून
निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन आष्टी तहसील
कार्यालयाचे प्रभारी तहसीलदार बाळदत्त मोरे यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत
भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदर्श आचारसंहितेचे लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व
राजकीय पक्ष नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालन करावे याबाबत मतदारांना या
आचारसंहिते बाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी निवडणूक विभागाचे अव्वल कारकून राजेंद्र पवार ,महसूल सहाय्यक दीपक गालफाडे
उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक
कालावधीमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवार यांचे वरील टीका ही कार्यक्रम आणि कार्य
याच्याशीच संबंधित असावी, शांततापूर्ण आणि उपद्रव रहित जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा
अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा, प्रचाराची जाहीर सभा प्रस्तावित जागा आणि वेळ
याबाबत आगाऊ सूचना देऊन परवानगी घ्यावी, ध्वनिवर्धक वापरण्याची प्रशासनाकडून
परवानगी घ्यावी, मिरवणुकीचा मार्ग आणि वेळ अगोदर निश्चित करण्यात यावी, त्याबाबतची
रीतसर परवानगी घेण्यात यावी, मतदारांना पैशाचे किंवा अन्य कशाचे प्रलोभन दाखवू नये,
मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये, वेगवेगळ्या जाती समूह किंवा
धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामध्ये मतभेद वाढेल, द्वेष किंवा तणाव निर्माण होईल
असे कोणतेही काम करू नये, राजकीय नेते कार्यकर्ते यांच्या खाजगी आयुष्याच्या
कोणत्याही पैलू वर टीका करू नये, निवडणूक प्रचाराची धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे
यांचा वापर प्रचाराची जागा म्हणून करू नये, मतदारांवर गैरवाजवी दडपण, धाक दडपशाही,
तोतयेगिरी हे निवडणूक अपराध समजले जातील निवडणूक प्रचारामध्ये घर,जागा,मालकाच्या
पूर्वपरवानगीशिवाय राजकीय पक्षाचे ध्वज, घोषणा लिहिणे, सूचना चिटकवू नये, इतर
पक्षांनी आणि उमेदवारांनी लावलेली भितीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रूप करू
नयेत हा अपराध ठरेल, ध्वनिवर्धक एका जागेवर लावलेले असोत किंवा चालत्या वाहनावर
बसवलेले असोत त्यांचा सकाळी ६ पूर्वी आणि रात्री १० नंतर करण्यात येऊ नये असे सांगत
तहसीलदार बाळदत्त मोरे म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमधील आचारसंहिता बाबत
शंका असेल भारताचा निवडणूक आयोग आणि आपल्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी
यांचेकडून स्पष्टीकरण करून घ्यावे असे त्यांनी शेवटी सांगितले.
0 टिप्पण्या