Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुका जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने रविवारी महिलांचा गुणगौरव सोहळा

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुका मराठा सेवा संघ प्रणित आष्टी तालुका जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा रविवार दि.१२ मार्च २०२४ रोजी आष्टी शहरातील जामखेड रोडवरील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालायात होणार आहे.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते , महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाच्या स्वागताध्याक्षा शिवमती सौ.सुवर्णाताई बाळासाहेब गि-हे यांनी केले आहे.या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या आष्टी शहराध्यक्षा सौ.विद्याताई चव्हाण उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुण्या म्हणुन बीडच्या जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ - मुंडे,मुंबईच्या पोलीस उपाधिक्षक सौ. शुभदा प्रदिप चव्हाण -घोगरे,आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डाॕ. जयश्री शिंदे,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षाताई माने,सौ.प्राजक्ताताई सुरेश धस,सौ.दमयंतीताई भीमराव धोंडे,सौ. सविताताई बाळासाहेब आजबे,बीड जि.प.च्या माजी सभापती सौ. शोभाताई उध्दव दरेकर, समाजसेविका सौ. संजीवनी जंजीरे या उपस्थित राहणार आहेत. वैशाली जाधव (आष्टी तहसिल महसुल विभाग), सौ.आशा रंगनाथ धोंडे (कन्या शाळा आष्टी),सौ.बबिताताई उत्तम बोडखे ( हरिनारायण विद्यालय शिक्षिका आष्टी),शिव छत्रपती पुरस्कार विजेती पैलवान कु.सोनाली महादेव तोडकर ( क्रिडा, सौ.प्रतिक्षा अमोल आमले ( कृषी - अंबेश्वर कृषीवन अंभोरा),संगीता राजेश थोरवे (वाचन संस्कृती), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण राज्यस्तरीय पुरस्कार विजेती यास्मीन अस्लम खाॕन (अंगणवाडी सेविका),सौ.राजश्री प्रकाश झांजे (वैद्यकीय), सौ.सायली तानाजी हंबर्डे - चौधरी (उकृष्ट निवेदिका),माजी सरपंच सौ.दिपाताई अनिल ढोबळे (कडा -सामाजिक - राजकीय),सौ.सरस्वती मधुकर गि-हे (चोभानिमगाव- राजकीय क्षेत्र ),सौ.पंखाबाई लक्ष्मण रेडेकर (आष्टी- नगरसेविका- राजकीय क्षेत्र ) या महिलांचा गौरव करण्यात येत आहे.हा गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी तालुका उपाध्यक्षा माधुरी तवले, तालुका सचिव वर्षाताई शिंदे,कार्याध्यक्षा सौ. अनिताताई सोपान निंबोरे,सौ.संजीवनी आप्पासाहेब टाळके आणि जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्या परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या