Ticker

6/recent/ticker-posts

केरुळात शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा लगडल्या; कृषी प्रेमींची सफर!.................... विष्णु मोहळकर यांना द्राक्ष बागेने दिला आर्थिक आधार; स्वावलंबनाची प्रेरणा

आष्टी( प्रतिनिधी) गेल्या पाच सहा वर्षांपासून सातत्याने विविध प्रयोग करून आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी यशस्वी बागा उभारून स्वालंबनाची प्रेरणा निर्माण केली आहे. दरम्यान, याच फळबागेतून आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासोबतच कृषी क्षेत्रात नवा आयाम निर्माण केला आहे. तालुक्यातील केरूळ येथील शेतीनिष्ठ शेतकरी विष्णू मोहोळकर यांनी मोठ्या धाडसाने सहा वर्षांपूर्वी द्राक्ष बागेचा सुरू केलेला प्रयोग आज स्थितीत यशस्वीतेकडे वाटचाल करीत असून द्राक्ष बाग मोठ्या मोठ्या घडांनी लघडली आहे. हे दृश्य पाहण्यासाठी तालुक्या सह विविध भागातील कृषी प्रेमी आपली सफर करत असलेले दिसत आहे. आष्टी तालुक्यातील केरूळ या एका गावातच पाच शेतकऱ्यांच्या १० एकरातील द्राक्ष बागा आहेत.आष्टी तालुक्यातील इतर गावच्या फळबागांची माहिती आणि प्रेरणा घेऊन आपल्या शेतातही विविध फळांच्या, द्राक्ष बागा करण्याचा प्रयोग जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर विष्णु मोहळकर,बाळासाहेब अनारसे,जाकीर शेख,बंडु सुर्यवंशी आणि कल्याण अनारसे यांनी यशस्वी करून दाखवला आहे. केरुळ हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या आष्टी तालुक्यातील एक सर्वपरिचित गाव आहे.या गावच्या शेतकऱ्यांना विविध नाविन्यपूर्वक काहीतरी घडवण्याच्या सातत्याने प्रेरणा असतात.यंदा या ग्रामस्थांनी शेतीमध्ये विविध फळबागा करण्याच्या प्रयोगाची सुरुवात केली.विशेषतः द्राक्ष बागेला प्राधान्य देण्यात आले आहे.प्रचंड कष्टाच्या बळावर त्यांनी यशस्वीतेकडे वाटचाल केली आहे.चेअरमन जाकीर शेख ,बंडु सुयवंशी,कल्याण अनारसे ,विष्णु मोहळकर प् यांची १० एकर द्राक्षबाग आहे.मोहळकर यांची दिड एकर बाग आहे.सहा वर्षाची बाग आहे.दिड हजार झाडे आहेत.आठ बाय पच फुट अंतरावर लागवड केलेली आहे. तिसरे पिक घेतले. लागवडीनंतर एक वर्षानंतर बागेत पीक घेतले.कमी पाण्यावर द्राक्ष येते अशी माणिक चमन वाणाचे त्यांची फळबाग आहे. वातावारण ढगाळ आल्याने विक्रीवर परिणाम होतोय भाव घसरत असल्याचे मोहळकर यांनी सांगीतले. आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथे सतिषमामा झगडे यांंची चार एकर द्राक्ष बाग आहे.त्यांचाही द्राक्ष बग प्रयोग यशस्वी झाला आहे.केरुळ येथील मोहळकर यांंच्या द्राक्ष बागेस ह.भ.प. दिनकरराव तांदळे महाराज ,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आणि शिक्षकनेते राजेंद्र लाड यांनी भेट देऊन पाहाणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या