
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील श्री छत्रपती शाहू,फुले, आंबेडकर,कृषी महाविद्यालयात
जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या
वर्षीच्या महिला दिनाची थीम "Invest in women: Accelerate Progress" देण्यात आली
आहे.या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आनंद चॅरिटेबल संस्थेच्या अध्यक्षा
सौ.दमयंतीताई धोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होत्या. मार्गदर्शक म्हणून पोलीस
अधिकारी कु. प्रविणा माळी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रशासन अधिकारी
डॉ.डी.बी.राऊत,प्राचार्य डॉ.श्रीराम आरसूळ,महाविद्यालयातील सर्व
प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.महाविद्यालय महिला समुपदेशन कक्ष
आणि तृतीय वर्षातील विद्यार्थीच्यावतीने सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत
करण्यात आले.जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि कार्यक्रमांची प्रस्तावना महिला
समुपदेशन कक्ष प्रमुख.प्रा.एस.एल. बनकर यांनी केली.जागतिक महिला दिनाच्या
निमित्ताने महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. पोस्टर प्रेझेंटेशन आणि
रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
कु.वैष्णवी क्षीरसागर, द्वितीय क्रमांक कु.सृष्टी धट,तृतीय क्रमांक कु.शामल दिसगाज
तर उत्तेजनार्थ बक्षीस कु.थाला पावणी या विद्यार्थिनी पटकाविले.महिला दिनानिमित्त
महाविद्यालयातील मुलींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.त्यामधे कु.कीर्ती
घोलप,कु.वैष्णवी काकडे, कु.प्रांजल घुले, कु.प्राप्ती लटपटे आणि कु.शिरिषा नुनावत
यांनी महिला दिनाचे विशेष महत्त्व सांगितले. त्याचप्रमाणे पोलिस कॉन्स्टेबल
कु.प्रविना माळी यांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी कोणते कायदे आहेत ते
सांगितले.मुलींना कधीही कोणत्या संरक्षण ची गरज लागली तर ११२ या नंबर वर फोन करा
सांगून मुलींना वेगवेगळ्या गोष्टी साठी मार्गदर्शन केले.प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.
बी. राऊत यांनी सर्व विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शना
मध्ये प्रमुख पाहुण्या सौ.दमयंतीताई धोंडे यांनी पार पाडलेल्या कौटुंबिक, सामाजिक,
शैक्षनिक जबादारीचे सर्व समावेशक माहिती विद्यार्थ्यांसमोर सांगितली. महाविद्यालय
प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले.महिला दिन का
साजरा केला जातो.याची पार्श्वभूमी समजून सांगितली.या जगात महिलांचं स्थान कस
सर्वश्रेष्ठ आहे हे सांगितले.संस्थेच्या अध्यक्षा सौ.दमयंतीताई धोंडे यांनी सर्व
विद्यार्थांना महिला आणि पुरुष समानता असली पाहिजे.आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेषत:
जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करतो आणि लैंगिक असमानतेबद्दल
जागरुकता वाढवतो.या दिवशी प्रत्येकाने आपल्या समाजातील महिलांचे कर्तृत्व
ओळखण्याच्या मार्गांचा विचार केला पाहिजे. मुलींच्या शिक्षणात आणि समाजातील सर्व
घटकांमधील लैंगिक भेदभाव दूर करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे महिलांचे कर्तुत्व या
जगात आहे तसेच पुरुष पण तेवढेच महत्वाचे आहे हे सांगितले. महाविद्यालयामधील सर्व
विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य कसे चांगल्या प्रकारे घडविता येईल यावर लक्ष केंद्रित
करावे अशा प्रकारच्या सूचना दिल्या. महिलांनी सक्षम असावं आणि नेहमी आपल्या
आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले.आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचं योगदान
अतुलनीय आहे असे सांगून सर्व मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.उत्कर्षा सावंत व कु.वैष्णवी लाखाऴ यांनी तर कु.स्मिता
अनारसे हीने आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तृतीय वर्ष मुली आणि महिला
समुपदेशन कक्ष प्रमुख प्रा.एस.एल.बनकर व सदस्य प्रा.डी.सी.सातव यांनी परिश्रम
घेतले.
0 टिप्पण्या