
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सराटेवडगांव जि.प. प्राथमिक शाळेस
आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन व आय.सी.आय.सी.आय.लोम्बर्डच्यावतीने शाळेला वॉटर फिल्टर
देण्यात आला.आयसीआयसी आय फाऊंडेशन शाळांसाठी विविध सुविधा पुरवित आहे.विद्यार्थाना
शुद्ध पाणी मिळावे. त्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी वाॅटर फिल्टर भेट देण्यात
आले आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्याची सोय झाल्याने
पालकांनी शिक्षकांनी आभार व्यक्त केले आहे.या वॉटर फिल्टरचे उद्घाटन दि.१८ मार्च
रोजी सकाळी आय.सी.आय. सी.आय फाऊंडेशनचे जिल्हा विकास अधिकारी चेतन पाटोळे व तालुका
समन्वयक यशवंत बहिरम यांच्या हस्ते करण्यात आले त्या अनुषंगाने इतर प्रकल्पांची
माहिती त्यांनी दिली ग्रामीण भागातील शाळेस रेन वॉटर हार्वेस्टिंग,मुला -मुलींकरिता
स्वच्छतागृह, सोलर पॅनल,अस्ट्रोनॉमी लॅब या सुविधा आय.सी. आय सी.आय फाऊंडेशन पुरवते
त्याचाच भाग म्हणून जि.प.प्राथमिक शाळा सराटे वडगाव शाळेस वॉटर फिल्टर देण्यात आले.
याप्रसंगी आय.सी.आय.सी.आय. फाऊंडेशन चे तालुका समन्वयक यशवंत बहिरम, शाळेचे शिक्षक
बनसोडे बी.डी. ,अस्वर एन.एम., थेटे जी.एम. सराटे वडगाव आनंदवाडी सरपंच भीमराव
बोडखे, इमामभाई शेख,आसिफ शेख, कल्याण नन्नवरे, सद्दाम शेख समस्त ग्रामस्थ उपस्थित
होते. शाळेला वाॅटर फिल्टर भेट दिल्याबद्दल आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन जिल्हा विकास
अधिकारी, तालुका समन्वयक यांचे आभार शाळेच्या व ग्रामपंचायतच्यावतीने आभार मानले.
0 टिप्पण्या