

उत्तम बोडखे,आष्टी.
----------------------------
सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र
होत चालल्या आहेत.आष्टी शहरात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.अशात पक्षांसह
प्राण्यांचे अन्न- पाण्यावाचून खूप हाल होतात.पक्षी व प्राण्यांची भटकंती
थांबावी.या उद्देशाने येथील सामाजिक कार्यकर्ते पक्षी मित्र महेश सुरेश मुरकुटे
यांनी टाकाऊ तेलाच्या डब्यांपासून अन्न व जलपात्र तयार करून अन्न व पाण्याची सोय
उपलब्ध करून दिली आहे.महेश मुरकुटे यांनी कोरोना कालावधीपासून सामाजिक सेवेचा वसा
हाती घेतला आहे.कोरोना कालावधीत सामाजिक भान जोपासत कोरोना रुग्णांना मोफत
अन्नधान्य वाटपासह विविध सोयीसुविधा उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न केले
आहेत.कोरोनानंतरही अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत.पर्यावरण संवर्धनासाठीही कार्य
सुरू केले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात महेश मुरकुटे हे पक्ष्यांसाठी अन्न व
जलपात्रांचे वितरण करतात.यंदा त्यांनी तेलाच्या टाकाऊ रिकाम्या लोखंडी डब्यांपासून
अन्न व जलपात्र घरीच तयार केले आहे.तेलाच्या डब्यांपासून चारही बाजूंना दाणे व पाणी
टाकण्याची सोय असलेली स्वतःच्या हातांनी बनविलेली सुमारे १०० जलपात्रे त्यांनी तयार
केली आहेत. पक्ष्यांना आरामात बसून अन्न पाणी घेता येण्याची व्यवस्था त्यांनी
निर्माण केली आहे.हातांनी तयार केलेली ही जलपात्रे आष्टी शहरातील ग्रामीण
रुग्णालय,तहसील कार्यालयासह विविध ठिकाणी असणाऱ्या वृक्षांवर पक्ष्यांसाठी लटकविली
आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी रामदास मोराळे यांच्यासह इतर आरोग्य
अधिकारी व आरोग्य सेविका व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच या उपक्रमाचा प्रारंभ
झाला. दरम्यान आष्टीचे तहसिलदार यांनी दि.३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी बीड यांना
महेश मुरकुटे यांंच्या आरोग्य सेवेत गेल्या वर्षापासून अविरत कार्याची दाखल घेऊन
त्यांना आरोग्य सेवेसाठी अथवा शासकीय पुरस्कारासाठी विचार करावा अशी विनंती केलेली
आहे.महेश सुरेश मूरकुटे (रा.आष्टी (ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे) हा गेल्या पाच
वर्षापासून आष्टी तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शासकीय रुग्णालयामध्ये
वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिविकार,लकवा,
कंबरदुखी मसाज, निसर्गोपचार करून आदी प्रकारची सेवा करत आहे.त्यामुळे सरकारी
दवाखान्याबद्दल व शासकीय सेवेबद्दल जनमानसात आदरयुक्त, सकारात्मक मत निर्माण
होण्यास मदत होत आहे. तसेच कोव्हीड - १९ मध्ये रस्त्यावरील बेवारस पेशंट,वृद्ध
समाजाने, नातेवाईकांनी बहिष्कृत केलेल्या लोकांची आस्थेवाईक प्रामाणिकपणे सेवा
केलेली आहे. शासकीय व खाजगी कोव्हीड सेंटरमध्ये विनामुल्य सेवा केली आहे.मुर्ती
यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन शासकीय सेवेसाठी अथवा शासकीय पुरस्कारासाठी विचार
करण्यात यावा अशी विनंती केली आहे. जिल्हाधिकारी पक्षी मित्र असलेल्या तरुणाचा गौरव
करतीलच अशी अपेक्षा आहे.
0 टिप्पण्या