Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.सुर्यकांत धोंडे व डॉ.अनिल हजारे यांच्या पुस्तकांचे माजी आ.धोंडे यांच्या हस्ते प्रकाशन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे भगवान महाविद्यालय येथे सायन्स काँग्रेस असोसिएशन व भगवान महाविद्यालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.सुर्यकांत धोंडे यांचे शारीरिक शिक्षण खेळाचा प्राचीन आणि आधुनिक इतिहास हे पुस्तक व राज्यशास्त्र विभागप्रमुख डाॅ.अनिल हजारे यांच्या राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना या पुस्तकांचे प्रकाशन शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे , इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ.विजया लक्ष्मी सक्सेना व डाॅ.अशोक कुमार सक्सेना , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भीमराव धोंडे यांनी म्हणाले की,प्रत्येक विषय शिक्षकांनी आपापल्या विषयाचे ज्ञान समाजासाठी कसे उपयोगी पडेल या दृष्टिकोनातून पुस्तकांचे लेखन करावे.डॉ. सूर्यकांत धोंडे व डॉ.अनिल हजारे यांनी आपपल्या विषयाच्या माध्यमातून केलेले हे पुस्तकांचे लेखन विद्यार्थी,अभ्यासक व समाजासाठी निश्चितच उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त करतो. या परिषदेसाठी उपस्थित असलेले डाॅ.अजयदादा धोंडे,श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदाचे प्राचार्य डाॅ.सतिशचंद्र सूर्यवंशी,प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, अधिसभा सदस्य तथा प्राचार्य डॉ .हरिदास विधाते, डाॅ.सोपान निंबोरे, डाॅ.लक्ष्मीकांत शिंदे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव वैद्य ,उपप्राचार्य डॉ.अप्पासाहेब टाळके ,प्रोफेसर अशोक देवकर ,प्रोफेसर दिगंबर पाटील, प्रोफेसर बाबासाहेब झिने, प्रा.श्रीकांत धोंडे ,डॉ,शत्रुघ्न करडुळे व या परिषदेसाठी उपस्थित असलेले विविध मान्यवर ,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ.सुर्यकांत धोंडे व डॉ.अनिल हजारे यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या