


आष्टी (प्रतिनिधी)
वेगवेगळ्या सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केल्या.
सावित्री तू शिक,त्याचबरोबर अफजलखानाचा वध,हिंदी मराठी गाण्यावर नृत्य व अल्बम सॉंग
काय सांगू राणी मला गाव सुटेना व देशभक्तीपर गीते यावर उपस्थित प्रेक्षकांची
विद्यार्थ्यांनी मने जिंकत आष्टी तालुक्यातील बावी जि.प.प्रा.शाळेत सांस्कृतिक व
विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या शाळेतील
बालकांवर बक्षीसांचा वर्षाव केला.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील मान्यवर व शिक्षक
उपस्थित होते.स्वामी विवेकानंद शिक्षकांची पतसंस्थेचे सचिव महेश शिंदे,उपाध्यक्ष
अशोक लटपटे व सर्व संचालक स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक मंडळ यांनी
कार्यक्रमासाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. त्याचबरोबर केंद्रातील
व आष्टीतील अनेक शिक्षक मित्र उपस्थित होते शाळेच्यावतीने सर्व मान्यवरांचे स्वागत
करण्यात आले.या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, केंद्रीय मुख्याध्यापक
संजय दहातोंडे, गावातील सरपंच डॉ.संगीता नवनाथ गर्जे,उपसरपंच भरत गोल्हार,ॲड
भाऊसाहेब लटपटे, ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्त मोठ्या प्रमाणात
उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेतील मुलांनी वेगवेगळ्या गाण्यावर अतिशय
बहारदार नृत्य सादर केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी सोपान दत्तू लटपटे यांनी
२६ हजार रु किंमतीचे आरोह फिल्टर भेट दिला.स्मार्ट टीव्ही स्वामी विवेकानंद
शिक्षकंची सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक जनार्धन लटपटे यांनी १० हजार रु
किंमतीची स्मार्ट टि.व्हि. शाळेला भेट दिला, रवींद्र लहानु सोनवणे यांनी ५ हजार रु
किंमतीची व्हील चेअर शाळेला भेट दिली.रोख बक्षीसे ४७ हजार ३०० रु तर एकुण ८८ हजार
५०० रुपयांची बक्षिसे विद्यार्थ्यांना उपस्थितांनी दिली. जिजाई मसाले कंपनीचे मालक
बाबूभैया गर्जे यांंच्यातर्फे वर्षभर जिजाई मसाले शाळेसाठी मोफत देण्याची घोषणा
केली. कार्यक्रमासाठी रोख बक्षीसे देण्यात आली.विशेष म्हणजे बावी गावात प्रथमच
जिल्हा परिषद शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर
झाला.कार्यक्रमासाठी सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.यावेळी पत्रकार
अण्णासाहेब साबळे,राजेंद्र लाड सर,संतोष दाणी सर यांच्यासह आष्टी येथील शिक्षक
मित्र आदर्श क्रिकेट टीम यांनी उपस्थित होते. संत भगवान बाबा विद्यालयातील शिक्षक,
मुख्याध्यापक गर्जे सर,स्वामी विवेकानंद विद्यालय बावी विद्यालयातील मुख्याध्यापक व
शिक्षक परिसरातील व डोईठाण केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक आष्टी
तालुक्यातील शिक्षक,मुख्याध्यापक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूत्रसंचालन
पांडुरंग लटपटे सर यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अशोक लटपटे सर
यांनी केले.पवार सर व झाडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे नृत्य बसवण्यासाठी मेहनत
घेतली. विधाते सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या