संत वामनभाऊंच्या कर्मभुमीतील ऊसतोड कामगाराचा मुलगा नागनाथ लाड झाला डीवायएसपी ................ कालपर्यंत ऊसतोड कामगार म्हणून मला लोक बोलायचे..आज मात्र " साहेबांच्या आई " म्हणून सगळीकडे बोलबाला सुरु झालय.....
आष्टी (प्रतिनिधी)
अठरा विश्व दारिद्र्य.. पिढ्यान पिढ्यांची गरिबी.. अल्पभूधारक..
सिंचन सुविधांचा कायम अभाव.. आणि त्यामुळे पोटाची खळगी भरणे दुरापास्त.. या सगळ्या
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ७० वर्षाच्या माता-पितांनी आपल्या मुलाला शिकवण्याचे
धाडस कायम ठेवले आणि पाच मुलींच्या पाठीवर झालेल्या नागनाथला अखेर " मोठ्ठा सायब "
करण्याचे वास्तवात आणले..! राज्यसेवेच्या परीक्षेत ४१ वी.रँक मिळवत मुलाच्या
स्वागतासाठीचे बॅनर पाहून आईचा ऊर भरून आला तर चार चार आमदार सत्कारासाठी आलेले
पाहून वडील राम लाड यांना वनवास संपल्याचा संत वामनभाऊंच्या साक्षीने मायभूमीत भास
झाला..!नागनाथ राम लाड.हा पाटोदा तालुक्यातील संत वामनभाऊ महाराजांच्या चिखली नाथ
येथील एक तरुण.आई रुक्मिणीबाई आणि वडील राम.अल्प शेती.अल्प उत्पन्न.. आणि त्यामुळे
ऊसतोड करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात जाणे क्रमप्राप्त.४१ वर्ष बेलापूरला
ऊसतोडणीचा व्यवसाय करून सुद्धा आईवडिलांना नागनाथ शिकावा मोठा व्हावा या राष्ट्रसंत
भगवानबाबा आणि राष्ट्रसंत वामनभाऊ महाराजांच्या विचार स्वस्त बसु देत नव्हता.नागनाथ
ही तितका जिद्दी असल्याने आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्याने
रात्रंदिवस अभ्यास केला.दहावी बारावीनंतर त्याने इंजीनियरिंग,बी. टेक शिक्षण घेतले.
खाजगी बँकेत उदरनिर्वाहासाठी नोकरी केली.२०२१ मध्ये सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून
त्याची नियुक्ती झाली पण आणखी मोठी पोस्ट मिळण्यासाठी त्याने २०२२ ला राज्यसेवेची
परीक्षा दिली.नुकत्याच लागलेल्या निकालात नागनाथ लाड राज्यात ४१ व्या.रँकने यशस्वी
झाला आहे.त्याला डीवायएसपी किंवा तहसीलदार हे पद मिळणार आहे.ही बातमी कळताच चिखली
नाथ गावात आनंदाला उधाण आले.सत्काराचे नियोजन झाले.सर्वत्र बॅनर लागले. अडाणी
निरक्षर असलेल्या नागनाच्या आई रुक्मिणीबाईला लेकाच्या स्वागताचे बॅनर पाहून
आनंदाश्रू आले तर चार चार आमदार सत्कारासाठी गावात आल्याचे पाहुन वडील राम यांना
अक्षरशः आकाश ठेंगणे झाले. या सत्कार समारंभप्रसंगी आ.बाळासाहेब आजबे, माजी
आ.भीमराव धोंडे, युवानेते सागर धस,महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर यांच्यासह
वरिष्ठ अधिकारी,पदाधिकारी, पत्रकार,कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते.ऊसतोड कामगार ते साहेबांच्या आई! सत्कार समारंभादिवशी लोकप्रतिनिधींसह गावकरी
उपस्थित होते. माध्यम क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी हजर होते. यावेळी नागनाथच्या आई
रुक्मिणीबाई यांनी सांगितले की,कालपर्यंत ऊसतोड कामगार म्हणून मला लोक बोलायचे. आज
मात्र साहेबांच्या आई म्हणून सगळीकडे बोलबाला सुरु झालय. आम्ही खूप आनंदून गेलोत..!
नागनाथने वडील राम आणि आई रुक्मिणीबाईचे पांग फेडले! नागनाथच्या आई-वडिलांना पाच
मुली आहेत.त्या सर्व मुलींचे लग्न ऊसतोडी करून त्यांनी केले. नागनाथ हा सहाव्या
क्रमांकाचा शेवटचा मुलगा होता.अत्यंत घाम कष्ट आणि परिश्रम करून त्यांनी त्याला
शिकवले.आणि उपजिल्हाधिकारी पदावर गवसणी घालत नागनाथनेही आपल्या आई-वडिलांचे पांग
फेडले.अनेक वर्ष नागनाथ नेही आई वडिलांसोबत ऊस तोडणी चे काम केले आहे.एमपीएससीचा
अभ्यास करताना नागनाथने कोणताही क्लास लावलेला नव्हता. ऊसतोड कामगार ते डीवायएसपी
हा प्रवास थक्क करणारा आणि तितका संस्मरणीय ठरला आहे.दैनिक झुंजारनेता
परिवाराच्यावतीने हार्दिक अभिनंदन .....!
0 टिप्पण्या