Ticker

6/recent/ticker-posts

आपल्याला कोणी कशी " टांग " मारली याचा विचार करायचा नाही संपुर्ण तयारीनिशी निवडणुकीत आता उतरायचे ...... माजी आ.भीमराव धोंडे.............कऱ्हेवाडी येथे गाव चलो अभियान

आष्टी (प्रतिनिधी) देशाची परिस्थिती बदलत चालली आहे. भारताचे कार्यक्षम पंतप्रधान मोदीजींचे काम उत्तम आहे.अतिउच्च शिक्षण असलेल्या आपल्या खासदार डाॕ.प्रीतमताई मुंडे आहेत.दोन्ही बहिणी आपल्या नेत्या आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे अहमदनगर -बीड रेल्वे काम झाले.प्रीतमताई मुंडे यांनी रेल्वेनेसाठी भरपुर निधी आणला कामाला गती दिली.विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत बोलत असताना आपल्या मनात कपट नसल्यामुळे दुसरे कपटी असल्याचे कळत नाही.तसे माझे २०१९ मध्ये झाले.आता आपण सावध राहु.मोदीसाहेब यांचा आपण आदर्श ठेवुन न थकता सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत आहे आणि करीत राहणार... शिक्षणाने आपले कुंटुंब सुधारते. " जमीन विका पण शिका " हा संदेश राष्ट्रसंत वामनभाऊ, राष्ट्रसंत भगवानबाबा यांनी दिलेला आहे. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. हे दुध पिल्यावर गुरगुरल्याशिवाय राहत नाही.आपल्याला २०१९ मध्ये कोणी कशी " टांग " मारली याचा आता विचार करायचा नाही संपुर्ण तयारीनिशी निवडणुकीत आता उतरायचे आहे.लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे या उमेदवार असण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्या सर्वाधिक मतांनी बीड लोकसभा मतदार संघातुन निवडुन येतील असा आत्मविश्वास भाजपनेते माजी आ. भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला. आष्टी तालुक्यातील बीडसांगवी जि.प. गटातील कऱ्हेवाडी येथे गाव चलो अभियान कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ. अजयदादा धोंडे,रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,विठ्ठल राऊत, बाळासाहेब वाघुले, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,भीमराव गोरे, माजी सरपंच अस्लम पठाण,पांडुरंग राख,बबन सांगळे,घनश्याम नरोडे, सरपंच सौ.छाया गायकवाड,सरपंच तुकाराम गिते,सरपंच दादासाहेब जगताप, भाजप युवा नेते सुनील सानप,बाळु सांगळे, पोपट सांगळे,सोनाजी आजबे,संतोष घुले, गणेश सांगळे,अशोक सानप,अंकुश राख, पांडुरंग राख,बबन सांगळे,घनश्याम नरोडे, देविदास पोकळे, मुख्याध्यापक संतोष नवले व सर्व शिक्षक वृंद, बाबुलाल सांगळे,नवनाथ सांगळे,भागीनाथ बांगर, जालिंदर विधाते,शिवाजी गिते,हरी गिते,युवानेते हरिभाऊ सांगळे,अनिल सांगळे,लखन सांगळे, पांडुरंग सांगळे,विठ्ठल सांगळे,नितीन गिते यांच्यासह सर्व सुपर वॉरीअर्स,शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख,गण प्रमुख,बुथ समिती आदि मान्यवर उपस्थित होते. माजी आ.धोंडे पुढे बोलताना म्हणाले की,मला २०१९ मध्ये डांग मारली जरी त्यांनी डांग मारली असली तरी मी त्यांचे एकवेळ निवडणुकीत प्रमाणिकपणे घोषणा देत काम केले होते. त्याची त्यांनी जाणीव ठेवली नाही.आता सावध राहुन आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीस तयार आहोत.क-हेवाडी येथे माध्यमिक शाळा ग्रामस्थांच्या आग्रहाखातर सुरु केली होती.चांगली सुरु आहे.कार्यकर्ते, गटप्रमुख,गणप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बुथप्रमुख यांनी मोदी सरकारने १० वर्षात विविध कल्याणकारी योजना राबवल्या त्या घराघरात पोहचवा खा.प्रीतमताई मुंडे यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे.बीडमध्ये भाजपाचा खासदार करण्यासाठी आतापर्यंतचे कामे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. खासदार फंड फार कमी मिळतो तो प्रत्येक गावाला मिळणे शक्य नाही.खासदारांनी मोठ्या योजना राबवायच्या असतात, सरकारने पिक विमा १ रुपयात मोफत दिला जात आहे. अहमदनगर -बीड-परळी रेल्वे पाटोदा तालुक्यापर्यंत धावत आहे.लवकरच परळी पर्यंत धावेल,विकास कामात भारतीय जनता पार्टीने वेग घेतला आहे. अयोद्याचे भव्य दिव्य मंदीर साकारले गेले आहे.नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्यायचे आहे. त्यांच्याबरोबर ठाम राहिले पाहिजे.मोदी जगात प्रसिद्ध नेते आहेत.त्यांना पुन्हा पंतप्रधान करायच आहे.आज ५ व्या. क्रमांकावर आहोत. जगात ३ नं.प्रगतशील देश करायचा आहे. महिलांना एसटी अर्धे तिकीट झाले आहे.पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणारा लाभ ६ हजारावरून १२ करण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त देश होत आहे.युद्धात आपले अडकलेले विद्यार्थी येईपर्यंत पंतप्रधान मोदी साहेबांनी युद्ध थांबवले असे सांगीतले.भारतीय जनता पार्टीतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी ''गाव चलो अभियान'' सुरू आहे त्या अनुषंगाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.भीमराव‌ धोंडे यांनी गाव चलो अभियानात प्रभावी पणे राबवत आष्टी मतदार संघ पिंजून काढला आहे. दि.६ रोजी कऱ्हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालय येथे बीड सांगवी जि.प.गटातील कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती.मोदी सरकारचे दहा वर्षांत विविध क्षेत्रातील केलेली प्रभावी कामे सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी आ. भीमराव धोंडे गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात प्रसिद्ध असून त्यांना पुन्हा पंतप्रधान व प्रितमताईं मुंडे यांना खासदार पदावर विराजमान करण्यासाठी सरकारचे कामे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.भारत देश मोदीजींच्या नेतृत्वाखालील प्रगतशील देश म्हणून १२ व्या क्रमांकावरून ५ क्रमांकावर आला आहे.३ क्रमांकावर आणण्याचा मोदींचा मानस आहे. खा.प्रितमताईंच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाले आहेत.आष्टी विधानसभा मतदार संघात शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर सोय उपलब्ध करून दिली आहे. शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे.उन्नती साधण्यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे पालकमंत्री असताना आष्टी विधानसभा मतदारसंघात विकास कामे मोठ्या प्रमाणावर झाले आहेत.परंतु गेल्या तीन वर्षांपासून विकासाला खीळ बसली म्हणून मी २०२४ विधानसभा निवडणुक लढवावी अशी जनतेची मागणी आहे असे प्रतिपादन माजी आ.भीमराव‌ धोंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.यावेळी बोलताना भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डाॕ. अजयदादा धोंडे म्हणाले की,कार्यकर्ता म्हणून मोदी सरकारने केलेली.१४ ते १९ कार्यकाळात भीमराव धोंडे यांनी केलेली कामे मोदी सरकारने व पंकजाताई,प्रितमताईंनी केलेली कामे पोहचवावेत.२०१९ मध्ये झालेल्या घटनेचा अनुभव आला आहे आता न थांबता २०२४ ची तयारी करायची आहे. भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भीमराव धोंडेसाहेब यांनी शिक्षण,विहिरी,रस्ते, विज,यासारख्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचे काम केले आहे.मोदी सरकारने संरक्षण क्षेत्रात भक्कम योगदान दिले मोदीजींचे नेतृत्व जगाने मान्य केले.खंबीर नेतृत्व आहे. महिलांना एसटी अर्धे तिकीट झाले आहे.पीएम किसान शेतकऱ्यांना मिळणारा लाभ ६ हजारावरून १२ करण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त देश होत आहे.माजी आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थी,वंचित घटकांपर्यंत माहिती पोहचावी असे आवाहन युवानेते अजय धोंडे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच दादासाहेब जगताप यांनी केले.यावेळी सरपंच दादा जगताप,नवनाथ सांगळे,बबन सांगळे, सुनिल सानप यांचे भाषणे झाले.कार्यक्रमाचे संचलन पंजाब बांगर यांनी तर आभार रामदास सांगळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या