आष्टी (प्रतिनिधी)
एक मादर्श व्यक्तीमत्व, कुटुंबवत्सल आणि प्रामाणिकपणाचा सर्वोच्च
मानबिंदू उपअभियंता पी.ई.तळेकर आप्पा आहेत.विनातक्रार तळेकर यांनी सर्वाना योग्य
न्याय दिला.

त्याग,परिश्रम,प्रामाणिकपणाने सेवाकाल पुर्ण करणारे उपअभियंता
तळेकरआप्पा असल्याचे प्रतिपादन माजी आ. साहेबराव दरेकर यांनी केले. आष्टी येथील
जि.प.बांधकाम उपविभागाचे उपअभियंता पी.ई.तळेकर आप्पा यांंच्या सेवापूर्ती
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्थिती संत मदन
महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,देविदास आबा धस,अभयराजे
धोंडे,महेश आजबे, समाजसेवक विजय गोल्हार,सभापती बद्रीनाथ जगताप,जि.प.सदस्य अमरराजे
निंबाळकर,सौ.सुवर्णाताई गि-हे, कार्यकारी अभियंता बालाजी राजपूत,विठ्ठलराव
गुंजाळ,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे,गटविकास अधिकारी राजेंद्र
गर्जे, आण्णासाहेब चौधरी, इंजि.बाळासाहेब भुकन,इंजि. तानाजी बापु
जंजीरे,परमेश्वरकाका शेळके,अनिलतात्या ढोबळे,सुनिल नाथ, पत्रकार उत्तम बोडखे,
इंजि.पी.बी.बोडखे,माजी सभापती दत्तात्रय जेवे,माजी सभापती संजयनाना ढोबळे, सुखलाल
मुथा,डाॕ.मधुकर हंबर्डे,सुरेश पवार,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते, इंजि.प्रवीण वारे,
बन्सीबापु मोरे, गौतम आजबे,बाबासाहेब मुळीक,डाॕ.युवराज तरटे,शिवाजी नाकाडे, जिल्हा
अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजि.वाघ,उपअभियंता पोपटराव जोगदंड महेश शिंदे,भाऊसाहेब
गाडे,उपप्राचार्य बाबासाहेब मुटकुळे,बळवंत आढाव,रामराव झांजे,राजेंद्र लाड,रोहित
सायकड, डाॕ.प्रकाश झांजे,जेष्ठ पत्रकार सीताराम पोकळे,कवी युवराज वायभासे,शामआबा
तळेकर,दुध संघाचे व्हाईस चेअरमन अशोक गर्जे,लेखापरिक्षक तथा सरपंच अनिकेत
आंधळे,ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ लोंढे,इंजि.सुनिल मोरे,प्रा.अभय
शिंदे,बबन पडोळे,आबासाहेब खिलारे,लक्ष्मण रेडेकर,रघुनाथ आवारे,आष्टी पंचायत समिती
कर्मचारी सह.पतसंस्थेचे चेअरमन अस्लम बेग,संचालक रोहित सायकड,अर्शद शेख,बापुराव
आंधळे, भाऊसाहेब कावदार, भाऊसाहेब म्हस्के,सारीका शहाणे,राणी निकम,विलास
सोनवणे,लक्ष्मण निकाळजे सतीश मासळकर,रावसाहेब लोखंडे,सुभाष खाकाळ, गंगाआबा आजबे,
नगरसेवक अस्लम बेग,प्रा.दत्ता नरसाळे,भागचंद झांजे,महादेव डोके,भगवान तळेकर पंचायत
समिती कार्यालयातील कर्मचारी, घाटागावचे ग्रामस्थ,सर्व नातेवाईक आदि
सामाजिक,राजकीय, अभियंता क्षेत्रातील बांधकाम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित
होते.यावेळी सौ.सुकन्या पंकज तांबे,सौ.दिपाली सुहास झांजे,तळेकर आप्पा यांची चार
वर्षाची नात असलेली कु.प्रिशा तांबे, उद्योगपती बळवंत आढाव,सेवानिवृत्त उपअभियंता
सदाशिव तळेकर,प्रा.दत्ता नरसाळे,इंजि.बाळासाहेब भुकन,भाऊसाहेब गाडे,भागचंद झांजे,
प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे, प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे, विजय गोल्हार,
देविदासआबा धस, ह.भ.प.बबन महाराज यांची भाषणे झाली. यावेळी दरेकर म्हणाले
की,तळेकरआप्पा यांनी जीवनातील प्रत्येक पाऊल विचारपुर्वक टाकलेले आहे.तळेकर
परिवाराचे आधारवड असलेले सदाशिव आण्णा यांनी आप्पांना घडविले आहे.गेली चार दशके
आप्पांनी शासकीय सेवेत केलेल्या प्रामाणिक,निस्वार्थ सेवेची पावती म्हणून
मान्यवरासह आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सदाशिव आण्णा हे
सर्व भावंडाना आदर्श मूल्ये,संस्कार आणि जडणघडणीत महत्वाचे आहेत.निस्वार्थ
समाजसेवेचा वारसा आणि धार्मिक वृत्तीचा अंगीकार करणारे तळेकर आप्पा आष्टीकरांसाठी
सदैव आदर्श राहतील असे शेवटी माजी आ.दरेकरनाना म्हणाले. यावेळी आपल्या मनोगतात
देविदास धस,विजय गोल्हार यांंच्यासह मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन तळेकर आप्पा
यांंच्या सहवासातील अनुभव कथन केले.आपली संपूर्ण सेवा आणि आयुष्य त्यांनी पुर्णपणे
समाज आणि गोरगरीबांसाठी केली. त्याचेच प्रतिबिंब आजच्या त्यांच्या सेवागौरव
सोहळ्यात दिसत आहे.इंजि. पी.ई.तळेकर यांचा आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी गावातील
एका शेतकरी कुंटुबात दि.५ फेब्रुवारी १९६६ साली जन्म झाला.प्राथमिक शिक्षण गावातच
तर माध्यमिक शिक्षण कडा व पाथर्डी येथे झाले.शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, खामगाव येथे
अभियांत्रिकीचे १९८४ मध्ये झाले.हे शिक्षण झाल्यानंतर १९८५ साली कनिष्ठ अभियंता
पदावर प्रथम नेमणूक झाली. २०११ ते २९१५ हा नोकरीतील कालावधी पाटोदा येथे वगळता
संपूर्ण सेवाकाल आष्टी येथेच जिल्हा परिषद बांधकाम विभागात गेला.सेवेच्या या
कालावधीत अनेक जिवघेणे अपघात झाले. अपघात होऊनही आप्पांना भगवंत कृपेने व आपल्या
सर्वाच्या आशिर्वादाने मोठी ईजा झाली नाही.ही पप्पाच्या सेवाकाळातील सत्कर्माची
पावतीच असावी असे वाटते. तळेकर आप्पांनी आपल्या बांधकाम विभागात अतिशय प्रामाणीकपणे
सेवा करताना सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले आहे.आष्टी पंचायत
समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत तळेकरआप्पांना ८ वर्षे सभासदांनी अविरोध चेअरमन
केले होते. सभासदांच्या हिताच्या विविध योजना,उपक्रम त्यांनी राबविले. *संगीत आणि
भजनाचा छंद जोपासला!* ----------------------- नोकरी करताना त्यांनी संगीत भजनाचा
छंद चांगला जोपासला आहे. संगीत भजनामुळे अनेक मित्रपरिवार त्यांनी जोडला आहे. आष्टी
तालुक्यातील जवळपास ५० टक्के गावात तळेकरआप्पांनी भजन सेवा केली आहे.आप्पांच्या
सेवाकालातील अनेक गोड कटू अनुभव त्यांना आले आहेत.दिवसभर कार्यालयातील कामाने
थकलेले असताना सुध्दा रात्री जेथे भजन असेल तेथे ते नेहमीच जातात हे विशेष...न
कंटाळला बांधकाम क्षेत्रातील सेवा त्यांनी अत्यंत सन्मानाने आणि प्रामाणिकपणे केली
आहे. उपअभियंता पदावर असूनही पदाचा कुठलाही गर्व न करता समाजासाठी जिद्दीने आणि
प्रामाणिकपणे रात्री उशिरापर्यंत कार्यालयात हजर राहून वरिष्ठांना किंवा
पदाधिकाऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासा त्यांचा आजपर्यंतचा दिनक्रम होता.
*कार्यालयीन सेवेला प्रथम प्राधान्य* --------------------------- सेवाकालात
आप्पांनी कधीच स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली नाही, त्यामुळे अनेकवेळा आजारी
असतानाही वरिष्ठांच्या आदेशाची पूर्तता करताना आम्ही पाहिले आहे म्हणूनच त्यांना
जिल्हापरिषद बीडचा आदर्श अभियंता पुरस्कारही मिळाला त्यांच्या कामाच्या या
वृत्तीमुळे ते काही वर्षे मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदावरती होते.स्वभावाने
मृदू असणारे आप्पा हे चुकीच्या गोष्टीला चुकच म्हणत असे अनेक मान्यवरांनी आपल्या
मनोगतातुन सांगीतले. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन बाळासाहेब तळेकर आणि
उपप्राचार्य डाॕ.बाबासाहेब मुटकुळे यांनी तर सत्काराला उत्तर व आभार उपअभियंता
पी.ई.तळेकरआप्पा यांनी मानले. *******************
0 टिप्पण्या