
आष्टी (प्रतिनिधी)
३६ दिवसापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोदाम हमालांचे
धरणे आंदोलन सुरु आहे आणि आज दि.४ मार्चपासून संघटनेचे अध्यक्ष तथा राज्य हमाल
मापाडी महामंडळाचे उपाध्याक्ष राजकुमार घायाळ बेमुदत उपोषण सुरु करीत आहे. त्यास
पाठींबा देण्यासाठी आष्टी ,कडा येथील हमाल एक दिवसाचे धरणे आंदोलन तहसील कार्यालय
सकाळी ११ ते ५ वा.पर्यंत झाले आहे. गेले ३६ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु
आहे. जिल्हाप्रशासनाचा असंवेदनशील कारभारामुळे संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यातील
महत्वाचे माथाडी नेते राजकुमार घायाळ यांनी गोदाम हमालांच्या प्रश्नासाठी आज
सोमवारी दि.४ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरु केले.या उपोषणास पाठींबा देण्यासाठी
आष्टी तालुक्यातील आष्टी व कडा येथील हमालांनी ४ मार्च रोजी आष्टी तहसील
कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले आहे. आंदोलन कर्त्याच्या मागण्या पुढील
प्रमाणे गोदामातील हमाली काम थेट वाहतूक धारणामुळे कमी झाले हमालांना काम केले तर
पैसे मिळतात.त्यामूळे हमालांचा रोजगार कमी झाला तर गोदाम हमालावर उपासमारीची वेळे
आली असल्याने संघटनेने वाहतूक कंत्राटच्या १३.१० मध्ये शुद्धीपत्रा द्वारे थेट
वाहतूक आणि द्वारपोहोच धोरणात ज्या-त्या गोदामातील हमालांकडूनच काम करुन घेण्याबाबत
दुरुस्ती करण्यात यावी तोपर्यंत पुरवठा विभागाने दि. २१ फेब्रुवारी २०२३ राजी
दिलेल्या सुचनेनूसार ज्या-त्या गोदामातील पूर्वीपासून नोंदीत हमालांकडून काम करुन
घ्यावे,महागाई निर्देशांकानूसार फरक हमाली देण्याबाबत न्यायालयाने १ ऑगस्ट रोजी
आदेश देवून १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत फरक देण्याबाबत आदेशीत केले त्याची अद्याप
अंमलबजावणी नाही.आनंदाचा शिधा किट पाच वेळा वाटप मात्र अद्याप त्याची नोव्हेबर २०२२
पासून हमाली नाही.डिसेंबर २०२३ जानेवारी २०२४ व आता फेब्रुवारी २०२४ ची नियमित
हमाली नाही. या व इतर मागण्यासाठी ३६ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनास व
राजकुमार घायाळ यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी दि.४ मार्च रोजी गोदामातील
हमालांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले आहे.या निवेदनावर दत्ता विश्वनाथ धोंडे,
रावसाहेब गोरख गाडे, आबासाहेब तुकाराम शिंदे,भाऊसाहेब एकनाथ शिंदे,राम नामदेव
मांडकर,संतोष तुकाराम कावेदार,शरद मुरलीधर गणगे,प्रविण अशोक धोंडे यांंच्या सह्या
आहेत.या हमालांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
0 टिप्पण्या