
आष्टी (प्रतिनिधी)
प्रसिद्ध साहित्यिक प्रा.आ.य.पवार यांच्या विज्ञान कविता व
काव्यसंग्रह राज्य व राज्याबाहेरील विविध विद्यापीठामध्ये पदवी अभ्यासक्रमाला
असल्याने नगर जिल्हयाच्या लौकिकात भर पडली आहे.त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या
राज्यग्रंथालय संचालनालय व नगर जिल्हा ग्रंथालय कार्यलयाच्या वतीने राज्याचे
ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या ग्रंथ उत्सवामध्ये
सन्मानपत्र देऊन कवी पवार यांचा गौरव करण्यात आला.आय.य.पवार यांच्या विज्ञान कविता
नांदेड ,नागपूर, अमरावती व मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात आहेत. त्यांचा
'धूळपेर' काव्यसंग्रह कर्नाटक विद्यापीठाच्या तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाला शंभर
गुणासाठी आहे. 'धूळपेर' काव्य संग्रहाला कुलगुरू व ज्येष्ठ साहित्यिक डॉ नागनाथ
कोत्तापल्ले यांची प्रस्तावना आहे.शेतकरी जीवन, महिला जीवन, सामाजिक,राजकिय व
विज्ञान आणि निसर्ग विषयावरील कविता असल्याने हा काव्य संग्रह सामीक्षकांनी
गौरविलेला आहे. पवारांची कविता स्वतंत्र वळणाची व छंदोबद्ध आहे. जिल्ह्याच्यावतीने
त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव झाल्याने प्रा.मधुकर राळेभात,डॉ.जतीन काजळे, प्रा
डॉ.सुभाष देशमुख,प्रा.डॉ.येळवंडे लक्ष्मीकांत आदि,कवी सय्यद आल्लाउद्दीन,पत्रकार
उत्तम बोडखे आदि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या