
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील प्रा.सविताताई शास्री महाराज यांनी २०२० -२०२१
मध्ये पीएच. डी.साठी लोकल युनिव्हर्सिटी सहारनपुर (उत्तर प्रदेश) येथे प्रवेश
घेतला. त्यांनी पेठ परीक्षा दिली.त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर गाईड डॉ. मोहम्मद
कामील यांंच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.पुर्ण केली. आवश्यक सर्व पुस्तकांची नावे
डाॕ.मोहम्मद कामील यांनी दिले.उत्तर भारतात पीएच.डी.करण्याचे कारण की, हिंदी व
संस्कृत भाषाचा साठा मिळाला. पेठ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर युनिव्हर्सिटीने
प्रा. सविताताई शास्री यांचा विषय मान्य केला. " नीतीपुरक मान्यताओ द्वारिका प्रसाद
माहेश्वरी जी का बाल साहित्य " या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे.दि. २४
फेब्रुवारी २०२४ रोजी प्रा.सविताताई शास्री महाराज यांचा व्हायवा झाला.व्हायवासाठी
प्रोफेसर वर्ग डॉ.मोहम्मद कामील.डॉ.सक्सेना सर,डॉ.शर्मा सर,डाॕ. राजेशकुमार (आग्रा)
हे उपस्थित होते.प्रा.डाॕ.सविताताई शास्री महाराजांच्या या यशाबद्दल माजी आ. भीमराव
धोंडे,प्राचार्य डाॕ.भगवान वाघुले, प्राचार्य डाॕ.कैलास वायभासे,प्रा.ईथापे,
प्रा.मार्केडे,पत्रकार उत्तम बोडखे,डाॕ.डी.बी.राऊत आदिंनी अभिनंदन
केले.प्रा.डाॕ.ह.भ.प. सविताताई शास्री महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करीत
करीत शिक्षण क्षेत्रातही त्यांनी पीचएच.डी.प्राप्त करुन यश संपादन केले आहे.
0 टिप्पण्या