Ticker

6/recent/ticker-posts

आज लघु पाटबंधारे उपअभियंता इंजि.अशोक खेडकर यांचा सेवापूर्ती समारंभ

आष्टी (प्रतिनिधी ) आष्टी येथील लघुपाटबंधारे उपविभाग भूम मुख्यालय आष्टीचे उपविभागीय अधिकारी इंजि. अशोक भानुदासराव खेडकर यांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होत असल्यामुळे आज आष्टी येथे त्यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला आहे.गेल्या अकरा वर्षातील त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेमुळे आणि कुशल प्रशासनामुळे त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली आहे.इंजि.अशोक खेडकर हे पाथर्डी येथील रहिवासी असून कौटुंबिक राजकीय आणि उच्च शैक्षणिक परंपरा लाभलेल्या घराण्यात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील अॕड. भानुदासराव खेडकर वकिली व्यवसायात असतानाच जिल्हा परिषद सदस्य आणि पाथर्डी पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी भूषवलेले असल्यामुळे परंपरागत जनसामान्यांमध्ये मिळून मिसळून सेवाभावी वृत्तीने काम करण्याचे त्यांना बाळकडू मिळालेले आहे. अशोक खेडकर हे विद्यार्थी दशेपासूनच अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले विद्यार्थी असा त्यांचा लौकिक असे शासकीय सेवेत असताना प्रशासनिक जबाबदारी आणि जनते प्रती असलेली आपुलकी विशेषतः शेतकरी वर्गा विषयी त्यांना अत्यंत जिव्हाळा असल्यामुळे कुशल प्रशासक आणि संवेदनशील स्वभाव असल्यामुळे त्यांची संपूर्ण सेवा ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडली आहे आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या खुंटेफळ साठवण तलाव या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पासाठी त्यांनी अत्यंत मौलिक असे काम केलेले आहे या प्रकल्पाच्या सर्वेक्षणापासून ते या खुंटेफळ साठवण तलावाच्या उजनी जलाशय ते खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा कार्यारंभ आदेश या सर्व कामांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. केवळ तांत्रिक स्वरूपाचे अभियांत्रिकी विषयी कामच नव्हे तर त्यांनी या तलावाच्या सुरूवातीला काही विरोधी असलेल्या सर्वांशीच त्यांनी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध जपून या तलावामुळे होणाऱ्या संभाव्य शेती सिंचनाबाबत या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती केली.. अशा प्रकारचे काम केवळ कुशल प्रशासक आणि संवेदनशील मनाचा अधिकारीच करू शकतो. साधारणतः सन २०१३ मध्ये त्यांची शाखा अभियंता म्हणून आष्टी येथील लघुपाटबंधारे उपविभागामध्ये नियुक्ती झाली त्यानंतर या उपविभागाद्वारे.या खुंटेफळ साठवण तलावासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय हालचाली अपेक्षित होत्या.या प्रकल्पासाठी विशेष विभाग नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.२ छत्रपती संभाजीनगर हा विशेष विभाग निर्माण करण्यात आला आणि त्या अंतर्गत आष्टी येथे लघु पाटबंधारे उपविभाग भूम मुख्यालय आष्टी हा उपविभाग निर्माण करण्यात आला या सर्व प्रक्रियेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून इंजिनिअर अशोक खेडकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. त्यांनी अकरा वर्षे अत्यंत परिश्रमपूर्वक छत्रपती संभाजी नगर ते मंत्रालय मुंबई येथे पर्यंत अत्यंत परिश्रमपूर्वक काम केल्यामुळे या प्रकल्पाचे काम दृष्टीपथात आलेले आहे. आष्टी तालुक्याच्या सतत दुष्काळी छायेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार्या या खुंटेफळ साठवण तलावाच्या कामा मुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये ते कायम संस्मरणीय राहतील असे त्यांचे काम आहे.लघु पाटबंधारे उपविभाग भूम मुख्यालय आष्टी या कार्यालयाचे वतीने त्यांच्या यशस्वी सेवापूर्ती बद्दल समारंभ पूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या