शिक्षक पती-पत्नीचा सुंदर हस्ताक्षर जोपासण्याचा अनोखा छंद.. ------------------------------- अनिल बेद्रे आणि शिल्पा बेद्रे यांनी सुट्टीच्या काळात ८ हजार विद्यार्थ्यांना दिला हस्ताक्षराचा वसा!
आष्टी ( प्रतिनिधी )
आपल्या दैनंदिन शैक्षणिक कर्तव्य प्रमाणिकपणे पार पाडत
आपल्याला लहानपणापासून लाभलेला सुंदर हस्ताक्षर असा इतर हजारांना प्रसारित करून
समाधान आणि आनंद घेत एका पती-पत्नीने आपला छंदही जोपासलाला आहे. हे दोघे शिक्षक
पतीपत्नी हे उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी २ ते ५ या वेळात वर्ग घेऊन आजपर्यत
जवळपास ८ हजार विद्यार्थ्थी घडविले आहेत.अनिल बेद्रे हे आष्टी तालुक्यातील भवरवाडी
येथील जि.प.शाळेत शिक्षक आहेत.ते २०१६ पासुन पती पत्नी हस्ताक्षर छंद लेखन वर्ग
घेतात. सौ.शिल्पा अनिल बेद्रे या आष्टी येथील नामांकीत वसुंधरा विद्यालयात शिक्षिका
म्हणुन कार्यरत आहेत. आॕनलाईन क्लास घेऊन आतापर्यत ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांंना
शिकविले आहे.आष्टी शहरातील आपल्या रहत्या घरी सुट्टीच्या काळातच दुपारी २ ते ५
यावेळात ७० विद्यार्थ्यांंना शिकवितात.आतापर्यत हस्ताक्षर छंद वर्गाच्या माध्यमातून
४ ते ५ हजार विद्यार्थ्यांं घडविले आहेत.आॕनलाईन व वर्गाव्दारे आजपर्यत ७ ते ८ हजार
विद्यार्थ्यांंना शिकविले आहे. आतापर्यंत ३० शिबीर घेऊन हजारो विद्यार्थ्यांंना
शिकविले.दोन वर्षात शालेय विद्यार्थ्यांंबरोबर जि.प.चे २५ प्राथमिक शिक्षकांचे वर्ग
घेऊन हस्ताक्षर छंद वर्ग घेतला असल्याचे अनिल बेद्रे व सौ.शिल्पा बेद्रे यांनी
सांगितले.अक्षर हा मनुष्याचा दागिना असतो असे म्हणतात.त्या अनुषंगाने हस्तक्षरातून
आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या छटा बाह्य जगावर उमटत असतात.समाज मनावर आपल्या
हस्तक्षरातून प्रभाव पडत असतो. त्या अनुषंगाने श्री व सौ बेद्रे या शिक्षक
पती-पत्नींनी हस्ताक्षराची सुंदर देन हजारो विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या
माध्यमातून प्रसारित करून एक वेगळी सामाजिक बांधिलकी जोपासले आहे.त्याबद्दल बेद्रे
दापत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या