
आष्टी (प्रतिनिधी )
आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथील रहिवासी असलेले निलेश गुंड
यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची हॅटट्रिक करत
शिक्षणाधिकारी पदाला गवसणी घातली आहे तर चिखली येथील शेतकरी कुटुंबातील राहुल तांबे
हे उपशिक्षणाधिकारी झाले आहेत.आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथील रहिवासी असलेले
निलेश अर्जुन गुंड यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झाले.त्यानंतर
माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय गढी या ठिकाणी झाले.पुणे इथे मराठवाडा मित्रमंडळ
महाविद्यालय येथून अभियांत्रिकी शाखेतील ईलेल्क्ट्रोनिक्स अँड टेली कम्युनिकेशनची
पदवी घेतली.२०१७ मध्ये एम पीएससी परीक्षेत पहिले यश मिळवत एसटीआय (राज्यकर निरीक्षक
) पदावर त्यांची निवड झाली.२०२३ पर्यंत ते या पदावर माझगाव, मुंबई येथे कार्यरत
होते.एम.पी. एस.सी.परीक्षेत त्यांनी २०२० मध्ये दुसऱ्यांदा यश मिळवले.या परीक्षेत
सहायक प्रकल्प अधिकारीपदी (आदिवासी विकास विभाग) त्यांची निवड झाली.सध्या सहायक
प्रकल्प अधिकारी म्हणून आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे ते कार्यरत
आहेत,आता २०२२ च्या राज्यसेवा परीक्षेत तिसऱ्यांदा उत्तीर्ण होत त्यांची
शिक्षणाधिकारी पदावर निवड झाली आहे.आष्टीचे शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गुंड
यांचे ते सुपुत्र आहेत. तर आष्टी तालुक्यातील चिखली येथील शेतकरी कुटुंबातील राहुल
शिवाजी तांबे या युवकाची उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाली आहे.राहुल याने पुणे
येथून २०१८ साली कृषी अभियांत्रिकी (बी.टेक) पदवी प्राप्त केल्यावर स्पर्धा
परिक्षेचा अभ्यास सुरू केला.त्यासाठी पुणे येथील इरा आयएएस अकादमीचे डॉ.संकल्प
देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राहुल तांबे यांची
उपशिक्षणाधिकारी ( राजपत्रित ) या पदावर निवड झाली आहे. आपल्या संघर्षात आई
संगीता,वडील शिवाजी तांबे,पुणे येथे औषध कंपनीत मॅनेजर असणारे भाऊ किशोर तांबे
यांचे कायमच पाठबळ मिळाले असे राहुल याने सांगितले.त्यांच्या यशाचे चिखली
ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या