उत्तम बोडखे.आष्टी. * ------------------------- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि प्रचंड संघर्ष वाट्याला असताना केवळ शेतीची आवड असल्याने त्यावर मात करत माळरानावर सिंचन सुविधा उपलब्ध करून फळबागा फुलवण्याचे अमूल्य कार्य आष्टीतील अनेक शेतकऱ्यांनी केले आहे. त्यात शेतीनिष्ठ प्रयोगशील शेतकरी म्हणून सतीशमामा झगडे यांच्या संकल्पनेचे चीज झालेली दिसून येत आहे.आष्टी तालुक्याच्या चोभानिमगाव येथे शेतीनिष्ठ शेतकरी सतीशमामा झगडे यांनी आपल्या जमिनीमध्ये नवीन संकल्पनेच्या आधारे संशोधन करून आधुनिक यंत्र तंत्रांच्या माध्यमातून फळबागा करण्याचे धोरण अवलंबिले.त्यानुसार कृषी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी शेती क्षेत्रातील अभ्यास अनुभवी तज्ञांच्या मार्गदर्शनातून तसेच कुटुंबातील बंधू भगिनींच्या सहकार्याने द्राक्ष बागेचा प्रयोग सुरू केला,प्रचंड मशागत नियोजनबद्ध परिश्रम खत आणि औषधांचा सुयोग्य वापर यातून त्यांनी सुंदर अशी द्राक्षबाग फुलवले आहे आज मीतिला तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बाग फुललेली बाग पाहायला मिळते आहे.गाव आणि परिसरातील महिला शेतकरी भगिनींच्या परिश्रमातून त्यांनी या बागेत घामाच्या धारांनी बनलेल्या द्राक्ष बागेच्या मोत्यासमान या फळाला पाहण्यासाठी जिल्हाभरातून कृषी प्रेमी भेट देत आहेत.आज माध्यम क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आणि सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे व सहकाऱ्यांनी इथे भेट घेऊन माहिती घेतली.यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी सतीशमामा झगडे यांच्या विशेष परिश्रम संकल्पना नियोजन यातून ही फुललेली लगडलेली द्राक्ष बागेची किमया प्रेरणास्थानी बनली आहे. आष्टी तालुक्यातील अत्यंत प्रतिकूल भूभागांमध्ये शून्यातून विश्वाची निर्मिती करण्याजोगी कामगिरी कृषी क्षेत्रातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत कष्टप्रद जीवन जगत द्राक्ष बाग फुलवली आणि सबंध आष्टी तालुक्याचा प्रेरणा स्त्रोत निर्माण झाला.ही किमया केली आहे.शेतीनिष्ठ शेतकरी आणि प्रयोगशील कृषी क्षेत्रातील दीपस्तंभ अर्थातच सतीशमामा झगडे यांनी! अपार कष्ट मेहनत जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर आष्टी तालुक्याच्या चोभानिमगाव येथील सतीशमामा झगडे आणि माजी विभागीय आयुक्त महेश झगडे या दोन्ही बंधूंच्या सुयोग्य विचार अन् कार्यातून कृषी क्षेत्रामध्ये अभिनव प्रयोग करत द्राक्ष बागेचा प्रयोग यशस्वी केला आहे. या बागेला आज शुक्रवारी आष्टी येथील जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे यांच्यासह आदींनी भेट देऊन पाहणी केली. यामागील सर्व कष्टप्रद भूमिका जाणून घेतली. आष्टी तालुका तसा कृषी क्षेत्रामध्ये मागासलेला. नैसर्गिक शेती अत्यंत प्रतिकूल,खडकाळ, मुरमाड जमीन. जलसिंचनाचा अभाव त्यामुळे येथील ७० टक्केपेक्षा अधिक शेतकरी शेतमजूर ऊसतोड कामगार पश्‍चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी जातात परंतु अशा अवस्थेमध्ये खचून न जाता सतीशमामा झगडे यांनी शेतीमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग करण्याचा ध्यास मनी घेतला त्याची सुरुवात ही केली आणि यश मिळवले.! आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव परिसरात पहिली द्राक्षबाग फुलविणारे प्रयोगशील शेतकरी म्हणून सतीशमामा झगडे यांच्याकडे पाहिले जाते.आष्टी तालुक्यात टाकळसिंग,केरूळ येथे यापूर्वी द्राक्ष बाग काही प्रमाणात होत्या परंतु बीड जि.प.चे माजी सदस्य सतीषमामा झगडे यांनी कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली द्राक्ष बागायती संदर्भात मार्गदर्शन घेतले.दीड एकरामध्ये दीड हजार झाडे आहेत. त्यापैकी ५० टक्के झाडांना फळ धरले.जळालेल्या झाडांच्या जागी परत मार्च महिन्यात झाडे लावले.त्यामुळे हे छोट्याशा असलेल्या झाडांना फळ धरले नाही.दरम्यान कोरोना लाॕकडाऊन काळात त्यांनी पुन्हा शेतीकडे पूर्ण लक्ष दिले.दिड एकर एसएसएन या वाणाची द्राक्ष बाग केली आहे. माणिक चमन वाणाचे द्राक्ष लगवड तीन एकर अशी द्राक्षे त्यांनी केली.दोन वर्षानंतर द्राक्षाला मोठे फळ धरले.दोन एकर बागेत घड लगडु लागले आहेत.तीन एकरातील द्राक्षालासुद्धा पुढील वर्षी फळ येणार आहे. एकूणच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि सर्वसामान्य मुरमाड जमिनीमध्ये प्रचंड मेहनत कष्ट जिद्द आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यातून याही जमिनीमध्ये उत्तमरित्या द्राक्ष बाग फुलवून तमाम शेतकरी बांधवांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे सतीशमामा झगडे यांचे आष्टी तालुक्यात कौतुक होत आहे. *चौकट* ------------ द्राक्षाची छाटणी केल्यानंतर शेडनेटमध्ये द्राक्ष टाकल्यानंतर १६ व्या.दिवशी ही मनुके तयार होतात. साधारणपणे एक एकर द्राक्षाची विक्री केल्यानंतर सध्याच्या भावात ४ लाख रुपये मिळू शकतात मात्र त्याचीच बेदाणा निर्मिती केल्यानंतर ८ ते १० लाख रुपये मिळू शकतात त्यामुळे बेदाणा निर्मितीतून ५० टक्के अधिक नफा होतो. बेदाणा मनुके निर्मितीसाठी सतीषमामा झगडे यांनी बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच प्रयोग केला आहे. ही चाळ तयार करण्यासाठी १२० फूट लांब व ८ फूट रुंदीचे शेडनेट उभारले आहे.यासाठी २ लाख रुपये खर्च आला आहे.यात जवळपास १० टन मनुके तयार होऊ शकतात.शेतकरी वर्षभर शेतामध्ये काबाडकष्ट करून फळबाग पिकवतो मात्र त्या शेतकऱ्याला विक्रीचे ज्ञान अवगत नसल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी तयार केलेली फळ ही पक्का माल तयार करून विकल्यास ३० टक्के नफ्यामध्ये वाढ होते असे सांगत तीन एकरामध्ये पुढील काळात द्राक्षचे फळ येणार आहे. आमच्या चोभानिमगाव परिसरात माझी द्राक्ष फळबाग ही पहिलीच आहे.एक धाडसाचा प्रयोग म्हणून मी हा प्रयोग केला.तो यशस्वी झाला आहे.शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता फळबाग शेती करावी असे माझे शेतकरी बांधवांना आवाहन असेल. *----- सतीशमामा झगडे* *(प्रयोगशील शेतकरी)* *********************