
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील भगवान महाविद्यालयामध्ये भगवान महाविद्यालय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व इंडियन सायन्स
काँग्रेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१ २०२४ रोजी 'रिसेंट ऍडव्हान्सेस
इन लाइफ सायन्स' या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या राष्ट्रीय परिषदेसाठी विज्ञान प्रेमी प्राध्यापक, संशोधक,विद्यार्थी व
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य
संयोजक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी केले आहे. या परिषदेचे
उद्घाटन माजी आ.भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली व इंडियन सायन्स काँग्रेसचे
माजी अध्यक्ष डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना व डॉ.अशोक कुमार सक्सेना यांच्या हस्ते होणार
आहे तर याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान व
तंत्रज्ञान विभागाचे माजी अधिष्ठाता डॉ.बी. बी.वायकर यांचे यांचे बीज भाषण होणार
आहे.अध्यक्षस्थानी कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे डॉ.बी. एस.खैरे हे
राहणार आहेत. सकाळी ११ वाजता संपन्न होणाऱ्या उद्घाटन समारंभानंतर प्रथम सत्र सुरू
होणार आहे.या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. लक्ष्मीकांत शिंदे (जे.ई.एस.
महाविद्यालय,जालना) तर प्रमुख वक्ते म्हणून प्रोफेसर डॉ.राम चव्हाण (प्राचार्य,
मॉडल डिग्री कॉलेज, घनसावंगी) हे उपस्थित असतील. द्वितीय सत्रामध्ये निवडक संशोधन
पत्रिकांचे वाचन व पोस्टर प्रेसेंटेशन होणार आहे.या सत्राचे अध्यक्षस्थान प्रोफेसर
डॉ.पी.एस.पाटील (यशवंत महाविद्यालय, सिल्लोड) व प्रोफेसर डॉ.डी. आर.देशमुख
(प्रतिष्ठान महाविद्यालय,पैठण) हे भूषवणार आहेत.तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर
डॉ.शिवराज पाताळे (गांधी महाविद्यालय, कडा) असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर
डॉ.उत्तम साळवे (स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय,बीड) उपस्थित राहणार आहेत.या एक
दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ सायंकाळी ५ वाजता कडा येथील आनंदराव धोंडे
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर
प्राचार्य डॉ. एस.जी.सूर्यवंशी (छत्रपती शिवाजी महाविद्यालय,श्रीगोंदा), प्राचार्य
डॉ.राम चव्हाण (मॉडल कॉलेज, घनसावंगी) आणि प्रोफेसर डॉ. लक्ष्मीकांत शिंदे
(जे.ई.एस. महाविद्यालय,जालना) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.या
परिषदेचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ असून या परिषदेचे संयोजक म्हणून
प्राणीशास्त्र विभागाचे प्रोफेसर डाॅ.दिगंबर पाटील तर सहसंयोजक म्हणून प्रोफेसर डॉ.
बाबासाहेब झिने व प्रा.श्रीकांत धोंडे हे काम पाहत आहेत.त्यांना संयोजन समितीचे
उपप्राचार्य डाॕ.ज्ञानदेव वैद्य , उपप्राचार्य डॉ. आप्पासाहेब टाळके, डॉ.सूर्यकांत
धोंडे, डॉ.प्रल्हाद खेतमाळस, डॉ.रामदास कवडे,डॉ. शत्रुघ्न करडूळे,डॉ.दिलीप
जरे,डॉ.नामदेव वाघुले,डॉ.वंदना घोडके,श्रीमती कांचन धोंडे, प्रा.काकासाहेब सोले व
डॉ.रवी मुळे यांचे सहकार्य लाभत आहे.या राष्ट्रीय परिषदेसाठी विज्ञान प्रेमी
प्राध्यापक,संशोधक,विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने
सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य संयोजक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ
यांनी केले आहे.
Pp
0 टिप्पण्या