(

आष्टी (प्रतिनिधी)
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य सुविधांचा दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावा या हेतूने आरोग्य संस्थांना कायाकल्प या पुरस्काराने दरवर्षी गौरवण्यात येते २०२२- ते २०२३ या वर्षातील कायकल्प पुरस्काराची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली.बीड जिल्ह्यातील सर्व संस्थानी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय धानोरा नांदुर घाट व ग्रामीण रुग्णालय आष्टीला पुरस्कार प्राप्त झाला केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सलगदा दुसऱ्या वर्षी पण प्रोत्साहन पत्र भेटून एक लाख रुपयाच्या उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ.अशोक बडे यांचे ग्रामीण रुग्णालय आष्टीसाठी मार्गदर्शन वारंवार भेटले.मागील ब-याच वर्षापासून ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिक्षक डॉ.राहुल टेकाडे राहुल यांनी जुन्या इमारतीचे नवीन इमारतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणून ग्रामीण रुग्णालयाचे कायकल्पचे काम केले आहे .त्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.टेकाडे राहुल.डॉ.
ढाकणे,डॉ.मसूद,डॉ.मोराळे डॉ. जावळे,श्रीमती शेख बेबी
(अधिपारीचारिका) सर्व स्टाफ सर्व विभाग प्रमुख संदीप धस,उमेश काटे व इतर सर्व स्वच्छतेचे पुढाकार करून स्वच्छता राबवणारे शिपाई लाड,
भवर,बोडखे या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या