Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेत्या पंकजाताई प्रीतमताई या भगीनींच्या मदतीने लिंबोडीला विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध........... विजय गोल्हार

आष्टी (प्रतिनिधी) सनदी लेखापरीक्षक असे उच्च शिक्षण असलेले सरपंच अनिल आंधळे यांना तुम्ही ग्रामस्थांनी सरपंचपदी बहुमताने निवडून दिल्याबद्दल आपल्याला या विकास कामांचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली आहे.आंधाळे हे उच्च शिक्षीत तरुण असल्याने सर्व योजनांची माहिती सरपंच अनिल आंधळे यांना मिळते.अनिल आंधळे यांच्या कार्यकाळातील विकास कामांची लिंबोडी ग्रामपंचायतमध्ये इतिहासात नोंद होणार आहे.ग्रामीण भागातील पहिली ग्रामपंचायत अशी आहे.लिंबोडी येथे घनकचरा व्यवस्थापन करणयात येत आहे. सिमेंट रस्ते,डांबरीकरण होउन शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत रस्ते होत आहेत.रस्त्याबरोबर सरपंच अनिल आंधळे यांनी शाळेलाही प्राधान्य देत शाळेचा ही सर्वांगिण विकास होणयासाठी संरक्षण भिंत उभा करणार आहेत. जलसिंचन विहीरमधून प्रतेक घरोघरी नळ जोडणी होणार आहे. इथून पुढे कधीच पाण्यासाठी लिंबोडीच्या माता माऊलींना डोक्यावर हंडा येणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करीत लोकनेत्या पंकजाताई,खा.डाॕ. प्रीतमताई या भगीनींच्या मदतीने लिंबोडीला विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे. या निधीचा योग्य प्रकारे वापर सरपंच वा त्यांचे सहकारी करतील असे प्रतिपादन समाजसेवक विजय गोल्हार यांनी केले.आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे दि.८ मार्च रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणुन ते बोलत होते. विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यावेळी विजय गोल्हार यांनी गावातील ग्रामस्थांनी आपण व्यवस्थित कामे करून घ्यावेत.दर्जेदार कामे करून घ्यावेत असे सांगितले.यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. समाजसेवक विजय गोल्हार म्हणाले की, तरुणांनी व्यसनाच्या आहरी न जाता उद्योगधंदे व व्यवसायामध्ये उतरावे. गावाचा विकास करण्यासाठी कोणतीही अडीअडचण आली तर मला फोन करा ,मी तुमचे कामासाठी नेहमीच हजर असतो.आपणास लिंबोडी गावाचे नंदनवन करायचे आहे.गावात अनेक कामे झालेले आहेत यापुढे करायचे आहेत.फक्त व्यसनाच्या आधीन न जाता युवकांनी नोकरीच्या मागे न धवता व्यावसाय,उद्योग धंदे करावेत व्यसन करू नयेत.यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.यावेळेस अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे गावातील भावीकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवक गोल्हार यांनी सांगितले की, लिंबोडीत माझे बालपण गेलेले आहे.या गावांमध्ये विकास कामात कसलेही मतभेद होऊ देऊ नका. कोणतेही काम असेल तर मला हक्काने सांगत चला व मला कोणीही अडचणीत हाक मारली तरी भेदभाव न करता प्रत्येकाच्या कामाला हजर राहील असे समाजसेवक विजय गोल्हार यांनी स्पष्ट सांगितले.यावेळी गावातील असंख्य ग्रामस्थ हजर होते. यावेळी आंब्याचा मळा रस्ता पाटलाचा मळा रस्ता तसेच शाळा कंपाऊंड घनकचरा व्यवस्थापन जलसिंचन विहिरी याचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी धर्माचार्य ह.भ.प. आदिनाथ महाराज आंधळे, ह.भ.प.विष्णू महाराज लिंबोडीकर, सरपंच अनिल आंधळे, उपसरपंच व माजी सभापती बाबासाहेब आंधळे,दिनकर आंधळे, मच्छिंद्र आंधळे, आजिनाथ आंधळे आणि गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मातामावल्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण लिंबोडीचे नंदनवन करणार आहोत असे समाजसेवक विजय गोल्हार यांनी सांगितले. यावेळी ह.भ.प.आदिनाथ महाराज आंधळे म्हणाले की,विकास करून घ्यावा.यावेळी बाबासाहेब आंधळे यांनीही मनोगत व्यक्त केले.समाजसेवक विजय गोल्हार यांचे लिंबोडीसाठी खूप मोठे योगदान आहे असे माजी सभापती बाबासाहेब आंधळे यांनी सांगीतले सरपंच अनिल आंधळे म्हणाले की, गावासाठी गोल्हार यांनी खूप मदत केली आहे,करीत आहेत. आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत,स्मशानभूमी ते आंब्याचा मळा सिमेंट काँक्रेट रस्ता,घनकचरा व्यवस्थापन,जलसिंचन विहीर,गवळी ओढा ते पाटलाचामळा खडीकरण आदि विकास कामांचे भूमिपूजन बीड जि.प.चे माजी अध्यक्ष समाजसेवक विजय गोल्हार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. गोल्हार पुढे बोलताना म्हणाले की,लवकरच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील खेडेपाडयात विकासगंगा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांंच्यामार्फत मुंडे साहेबांचे राहिलेले स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे.पुन्हा केंदात ग्रामविकास मंत्री लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे आपल्याला शपथ घेतांना दिसतील आणि राहिलेला विकासाचा अनुशेष भरून निघणार आहे असे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते विजय गोल्हार यांनी यावेळी सांगितले. यावेळी धार्माचार्य ह.भ.प. आजिनाथ महाराज शास्त्री,ह.भ.प.विष्णू महाराज आंधळे,माजी सभापती बाबासाहेब आंधळे,सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच समाधान आंधळे, दिनकर आंधळे, हैसराव आंधळे,मच्छिंद्र आंधळे, शिवाजी आंधळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच अनिल आंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.लिंबोडी परिसरात सर्व विकासकामे दर्जेदार होतील.विकासकामांना गती दिली जाईल. आतापासुन निधी खेचुन आणण्याचा माझा प्रयत्न राहील.आपण पंकजाताई आणि प्रीतमताई व गोल्हार यांंच्या मदतीने विकासकामे करणार आहोत.आणखी भरपूर विकिस कामे करायची आहेत हे सर्व विकास कामे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय गोल्हार यांच्यामुळेच झाले आहेत असे समाजसेवक विजय गोल्हार यांचे सरपंच अनिल आंधळे यांनी आभार मानले आहेत. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन व आभार सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच समाधान आंधळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या