Ticker

6/recent/ticker-posts

स्वामीकाज ,गुरुवचन, पितृवचनसेवापती,सत्यवचन,दुसऱ्याच्या दुःखाने दुःख होणे या विष्णुच्या महापुजा ............ ह.भ.प.संजय महाराज पाचपोर......स्वातंत्र्य सैनिक वै.साहेबराव थोरवेदादा पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनप्रसंगी प्रतिपादन.

आष्टी (प्रतिनिधी) खरे बोलणे हे तप आहे.प्रारब्ध हे भोगावेच लागते,प्रपंचात पक्षाप्रमाणे असले पाहिजे.जीवन हे सुंदर आहे परंतु हे जगत असताना अध्यात्माचा सुगंध सोबती असावा लागतो.सत्य,सेवा आणि अध्यात्माच्या माध्यमातून मनुष्य आनंदी जीवन जगू शकतो.मनुष्याने संसारी जरूर असावे पण त्याहीपेक्षा संस्कारी अधिक असले पाहिजे. गायी सांभाळणे व्यावसाय नाही तर पारमार्थिक काम,सेवा आहे.धर्म सांभाळणा-यांना आपण सांभाळले पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखाने तुम्ही दुःखी होत असताल तर ती एक विष्णुची महापुजा आहे. प्रत्येकाच्या जीवनात देव,धर्म व देशसेवा घडली पाहिजे.संत तुकाराम महाराज ,संत एकनाथ बाबा,संत ज्ञानेश्वर माऊली हे आमचे हायकमांड आहेत.त्यांनी सांगीतल्याप्रमाणे आम्ही गोपालन करीत आहोत.स्वामीकाज , गुरुवचन,पितृवचन सेवापती,सत्यवचन, दुसऱ्याच्या दुःखाने दुःख होणे या विष्णुची महापुजा आहेत असे प्रतिपादन नामवंत कीर्तनकार रामायाणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांनी केले. आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथे ॲड.हनुमंत थोरवे यांचे वडील व युवानेते धैर्यशील थोरवे यांचे आजोबा जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी वै.साहेबराव थोरवे दादा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहातील काल्याचे कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ. साहेबराव दरेकर, देवीदास धस,ॲड. चंद्रकातभाऊ आजबे, राजेंद्र धोडे,सतिषआबा शिंदे,सुशिलाताई मोरोळे, दादासाहेब मुंडे, दिलीपदादा हंबर्डे, राजाभाऊ दरेकर,सागर दरेकर,ॲड.हनुमंत थोरवे,युवानेते धैर्यशील थोरवे,ह.भ.प.दिनकरराव तांदळे,के.के.काळे,डाॕ.मधुकर हंबर्डे निळकंठ तावरे महाराज,शिवाजी सुरवसे,कल्याण पोकळे, सुखलाल मुथा, बलभीमराव सुंबरे,सरपंच सावता ससाणे,रविंद्र ढोबळे,रघुनाथ आवारे, कांतीलालशेठ चानोदिया,रामेश्वर महाराज ढाकणे (आळंदी),ह.भ.प.राऊतदादा महाराज, ह.भ.प.निवृत्तीदादा बोडखे ,रामदास महाराज रक्टाटे,ज्ञानेश्वर माऊली कराळे,कुताळ महाराज, दिपक महाराज,रविंद्र महाराज सुद्रीक, रामकृष्ण शास्री महाराज,पांडुरंग गावडे,सुरेश काळे,भगवान धुमाळ,नामदेव शेळके,ॲड.श्रीकृष्ण देशपांडे,पत्रकार उत्तम बोडखे,शिरीषभाऊ थोरवे,अर्जुन काकडे, राजेंद्र लाड,सिध्देश्वर शेंडगे,दादा विधाते, रमेश ढगे,बाबासाहेब कर्डीले,प्राचार्य रविकांत सुंबरे,रावसाहेब भस्मे, सरपंच बाळसाहेब मिसाळ,पांडुरंग जंजीरे, बाळासाहेब थोरवे, महादेव मुंगसे आदि राजकीय,सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाचपोर महाराजांनी अभंगाचे निरूपण करताना विविध दृष्टांत देत उपस्थित भाविक भक्तांना खेळवून ठेवले.प्रारंभी संत महंतांच्या आणि माजी आ.दरेकरनाना यांच्या हस्ते थोरवेदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ह.भ.प. संजय महाराज पाचपोर पुढे म्हणाले की, आळंदीत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेतुन १०७ वर्षापासुन कीर्तनकार घडविले जात आहेत. येथे पुरोगामी विचारातुन प्रवेश दिला जातो,प्रवेश फाॕर्मवर जातीचा रकाना नाही.सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांंना येथे प्रवेश दिला जातो.हा समतेचा विचार जोग महाराज संस्था देत आली आहे असे सांगत संत महतांनी मानवी जीवनाला फार मोठा भक्तीचा महिमा दिला आहे त्यांनी सांगितलेल्या विचार आणि कार्यावर चालल्यास मनुष्याची फार मोठी यश प्राप्ती होऊ शकेल. सद्यस्थितीवर भाष्य करताना आता दोन उपमुख्यमंत्री व एक मुख्यमंत्री झाल्याने पंढरीला तीन यात्रा कराव्या लागतील.. म्हणजे तिघांच्या हस्ते महापुजा करता येतीला आषाढी व कार्तीक वा-या आहेत.एक वारी वाढवावी लागेल असे मिश्कील वर्णण केले, महाराजांनी अनेक दृष्टांत दिली गरीबांची झोप श्रीमंत असते तर श्रीमंतांची झोप गरीबी असते असे सांगत त्यांनी आजही श्रीमंत घरची मुले आई वडिलांना सांभाळ करायला तयार नाहीत, सेवा करीत नाहीत हे वास्तव अधोरेखित करून मनुष्याने संसारी जरूर असावे पण त्याहीपेक्षा संस्काराची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले. उपस्थित रसिक प्रेक्षक आणि भाविक भक्तांनी त्यांच्या वास्तवावरील केलेल्या वाणीला प्रतिसाद दिला. समाजातील आर्थिक दृष्ट्या श्रीमंत असलेल्या व्यक्तींनी आपल्या घराची दरवाजे सतत उघडी ठेवली पाहिजेत या दरवाजातून गोरगरीब व गरजू समाजातील व्यक्तींना सढळ हाताने मदत करावी अशी वृत्ती ठेवली पाहिजे असे सांगत आपल्या कीर्तन सेवेमध्ये बोलताना संजय महाराज म्हणाले की, समाजातील व्यक्तींनी अध्यात्म अथवा परमार्थ नाही केला तरी चालेल परंतु समाजामध्ये राहत असल्यामुळे समाजाला गरज लागेल त्यावेळी समाजासाठी उपयोगी पडण्याची गरज असते समाजावरहीत व्यक्तीला काहीच किंमत नसते.गरजू व्यक्तींना मदत करणे ही सर्वात मोठी नैतिकता आहे.श्रीमंत माणसांनी आपल्याकडील पैशाचा उपयोग गरजू आणि दीनदुबळ्या लोकांसाठी मदतीसाठी केला पाहिजे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये संस्कृती रक्षणाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदू धर्मातील नागरिकांनी आपल्या उत्पन्नातील किमान १० टक्के रक्कम ही देश देव आणि धर्म यासाठी समाजाला दान केली पाहिजे.हे दान देखील कर्तव्य म्हणून केले पाहिजे केवळ नावासाठी दानधर्म करू नये असे आवाहन करून ते पुढे म्हणाले की, समाजातील कीर्तनकार प्रबोधनकार राजकीय नेते आणि वैद्यकीय व्यावसायिक यांनी कधीही खोटे बोलू नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असते. प्रयत्न करूनही होत असेल तर ते प्रारब्धाने होत असते. कोणाचं कसं प्रारब्ध असेल ते सांगता येत नाही.ज्या घरी आदर नाही,प्रेम नाही, त्या घरी कोणीच जाऊ नये. थोरवेदादा यांंची अखेरपर्यत कुंटुंबातील सदस्यांनी सेवा केली.१२० वर्षे आयुष्य लाभलेले थोरवेदादा हे भाग्यवान ठरले असे पाचपोर महाराज यावेळी म्हणाले. थोरवे वकील यांनी व नातु धैर्यशीलने वै.थोरवेदादा यांची चांगली सेवा केलेली आहे.त्यामुळेच आज याठिकाणी समाजातील सर्व घटकातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत. लाभाशिवाय प्रेम करणारे फक्त आई बापच आसतात,त्यांची सेवा करा.. तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी कोणत्याही देवाला तीर्थ क्षेत्राला जायची गरज नाही. आईने आपल्या लहानपणी ताटा समोरची घाण सहन केली होती तर तुम्ही देखील म्हातारपणी आई वडिलांची सेवा करताना देखील सहन करावी त्यांचा म्हतारपणी कंटाळा करू नका असे सांगत अत्यंत प्रभावीपणे कीर्तन सेवेचा समारोप केला.यावेळी शिवाजी सुरवसे,दादासाहेब मुंडे,राजेंद्र धोंडे, बलभीम सुंबरे , सुशीलाताई मोरोळे, ॲड.चंद्रकातभाऊ आजबे,ह.भ.प. निवृत्तीदादा बोडखे महाराज,माजी आ. साहेबराव दरेकर यांनी श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी माजी आ.दरेकरनाना म्हणाले की,वै.स्वातंत्र्यसैनिक थोरवेदादांनी सर्व क्षेत्रात कार्य केले.थोरवेदादा यांंच्यापाठीमागे धैर्यशील थोरवे यांनी राजकीय क्षेत्रात चांगले काम करावे. थोरवेदादा यांनी शरदचंद्र पवार,शंकरराव चव्हाण,सुंदरराव सोळंके, विलासराव देशमुख यांना आष्टी तालुक्यात आणले होते असे सांगीतले. यावेळी ॲड.हनुमंत थोरवे म्हणाले की,४० वर्षे दादांनी त्यांच्या वडीलांचे पुण्यस्मरण कार्यक्रम केला म्हणुन मी हयात असेपर्यत थोरवेदादा यांंच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम करणार आहोत.या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह आयोजित करणार आहोत असे सांगत आपल्या आश्रुंना मोकळी वाट करुन दिली.उपस्थितांचे आभार ॲड.हनुमंत थोरवे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या