
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील जि.प.बांधकाम उपविभागाचे उपअभियंता इंजि.पी.ई.तळेकर (आप्पा) यांचा शनिवार दि.२ मार्च २०२४ रोजी सेवागौरव सोहळा आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात सकाळी ११.३० वा.होणार आहे.या सेवागौरव सोहळ्यास संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,आ.सुरेश धस,आ.
बाळासाहेब आजबे,माजी आ.
भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,समाजसेवक विजय गोल्हार,बीड जि.प.चे माजी सदस्य देविदासआबा धस,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष इंजि.तानाजीबापु जंजीरे,जि.प.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बालाजी राजपुत,आष्टीचे गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे आदि सामाजिक,राजकीय,
धार्मिक,अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.उपअभियंता इंजि.पी.ई. तळेकर (आप्पा) यांच्या सेवागौरव सोहळ्यानिमित्त रविवार दि.३ मार्च २०२४ रोजी आष्टी-जामखेड रोड येथील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे सायंकाळी ७ वा.महाराष्ट्र शासन सर्वोच्च कंठ संगीत पुरस्काराने सन्मानीत असलेले पंडित कल्याणजी गायकवाड यांचा शास्त्रीय अभंग वाणी गायनाचा कार्यक्रम होणार आहे.गायन साथ कु.कौस्तुभ गायकवाड,तबला साथ महादेव सगळे,किबोर्ड साथ कृष्णदेवा व्यवहारे यांची लाभणार आहे.आष्टी तालुक्यातील संगीत प्रेमी बंधु भगिनींनी या संगीत भजन व शास्त्रीय अभंगवाणी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवानिवृत्त होत असलेले उपअभियंता इंजि.पी.ई.
तळेकर (आप्पा) यांनी केलेले आहे.
0 टिप्पण्या