
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक
शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन
यांच्या प्रमुख उपस्थितीत,मुख्याध्यापक बी.यु.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि
ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भादवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.वि.भा.साळुंके
यांच्या मार्गदर्शनाखाली कु.सिद्धी खोदरे,प्रज्वल ओव्हाळ यांनी बहारदार सूत्रसंचालन
केले. शिक्षक नितीन जाधव,आदिनाथ म्हस्के, भापकर सर यांनी विद्यार्थ्यांना भावी
वाटचालीसाठी बहुमोल मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.चैतन्य घोडके,कु.अमरीन पठाण,सागर
भांड या इयत्ता दहावीच्या विद्यार्थी,विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली.कवी
प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी ५५ वर्षांपूर्वी त्याच शाळेत शिक्षक म्हणून सेवा
केलेले त्यांचे वडील सय्यद अमीनोदिन गुरुजी यांच्या आठवणी जागवल्या.त्यानंतर
त्यांनी आपल्या मिस्कील शैलीत विनोदाची पेरणी करीत आपल्या काही गाजलेल्या कविता
सादर केल्या.सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. यावेळी खांदवी,काळे,गव्हाणे,जगताप मॅडम
यांनी यशस्वीते साठी परिश्रम घेतले.यावेळी डॉ.सय्यद वलीयुद्दीन हे उपस्थित
होते.शिक्षक लगड यांनी सर्वांचे आभार मानले.
0 टिप्पण्या