
आष्टी (प्रतिनिधी)
मातृभाषेतून मनुष्याच्या विचारांचे पोषण होते, त्यातून
संस्कृतीचा विकास होतो आणि त्यामुळेच राष्ट्र बलवान होते म्हणून आपण मातृभाषेचा
मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे असे विचार मराठी भाषा गौरवदिन तथा श्रेष्ठ कवी
कुसुमाग्रज यांच्या जयंती प्रसंगी प्राचार्या साधना पाटील यांनी आपल्या भाषणातून
मांडले. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मराठी साहित्य प्रतिष्ठान तर्फे माहीजळगाव
येथील श्री विठ्ठल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव
दिनानिमित्त कुसुमाग्रज जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
कवी इंद्रकुमार झांजे व कवी डॉ.शिंदे हेही उपस्थित होते कवी इंद्रकुमार झांजे यांनी
स्वरचित कविता गाऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले व कवी डॉ.शिवाजी शिंदे यांनीही
आपल्या कविता गायल्या दहावी बोर्ड परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी
शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात कवी आ.य.पवार यांची गायिका मालती यांनी गायलेली
'कवठ'ही निसर्ग कविता विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आली.टाकळी खंडेश्वरी येथील
जलाशयात असलेल्या कवठाच्या झाडावर ही कविता केली गेली होती.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी
स्वरचित कविता,पाठ्यपुस्तकातील कविता गायल्या.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक गवारे
सर यांनी उपस्थित आमचे आभार मानले.
0 टिप्पण्या