Ticker

6/recent/ticker-posts

टाकळी अमिया येथील शाळेला आय. सी.आय.सी.आय फॉऊडेशनच्यावतीने सौर ऊर्जा प्रकल्प दिला भेट

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथील जि.प.शाळेला आय.सी. आय.सी.आय.फाऊंडेशन आणि आय.सी.आय.सी. आय.लोम्बार्डच्यावतीने शाळेला सौर ऊर्जा प्रकल्प देण्यात आला. या सौर ऊर्जा प्रकल्पाचेचे उद्घाटन आय.सी.आय. सी.आय.फाऊंडेशनचे जिल्हा विकास अधिकारी चेतन पाटोळे,तालुका समन्वयक यशवंत बहिरम यांच्या हस्ते करण्यात आले.इतर प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.ग्रामीण भागातील शाळेस रेन वॉटर हार्वेस्टिंग,मुलामुलीसाठी स्वच्छतागृह,सोलर पॅनल, अस्ट्रोनॉमी लॅब या सुविधा आय.सी.आय सी.आय फाऊंडेशन पुरवते त्याचाच भाग म्हणून पोखरी येथे सोलर पॅनल सिस्टीम देण्यात आली.याप्रंसगी आय.सी.आय.सी.आय. फाऊंडेशनचे अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक रमेश बोडखे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख चौधरी, उपाध्यक्ष अध्यक्ष सखाराम ससाणे,सर्व सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या